अकोला

कोरोना लसीकरण; साडेचार लाख नागरिकांची कोव्हिशील्डला पसंती!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू विरोधात युद्ध जिंकण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत नागरिक कोव्हिशील्ड लसीला जास्त पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ९०७ नागरिकांनी आतापर्यंत कोव्हिशील्डची लस घेतली आहे. केवळ ९६ हजार ५३८ नागरिकांनी कोव्हॅक्सीनलाच पसंती दिली आहे. त्यामध्ये पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांचा समावेश आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या.

१ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारकडून लसींचा अल्प साठा मिळत असल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीम सतत प्रभावित होत आहे. कोव्हॅक्सीन व कोव्हिशील्ड लसींपैकी जिल्ह्यात कोव्हिशील्डचा पुरवठा अधिक होत असल्याने कोव्हिशील्डलाच नागरिक अधिक पसंती देत आहेत.

आतापर्यंत ५.६३ लाख नागरिकांनी घेतली लस

जिल्ह्यातील ४ लाख १५ हजार ७२६ लाभार्थ्यांनी आतापर्यंत कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. तर १ लाख ४७ हजार ७१९ लाभार्थ्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक दिसत असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे.

लसीकरणात ४५ वर्षांवरील नागरिकांची आघाडी

लसीकरणात सर्वाधिक ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. या वयोगटातील २ लाख ३ हजार ६१९ लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. ६० वर्षांवरील १ लाख ७७ हजार ७९६ तर १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ८२ हजार ३० लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

पुरुष पुढे; महिला मागे

लसीकरण मोहिमेत महिलांच्या तुलनेत पुरुषांची आघाडी असल्याचे दिसून येते. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ७७ महिलांनी कोरोनाची लस घेतली, तर २ लाख ६२ हजार २८४ महिलांनी लस घेतली. त्यामुळे लसीकरणात पुरुष महिलांच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यासाठी सर्वाधिक कोव्हिशील्डच्या लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कोव्हिशीलची लस देण्यात येत आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

CNG दर स्थिर, पण महागाईचा फटका! मुंबईत ऑटो-टॅक्सी भाडे वाढणार? युनियनचा प्रशासनाला प्रस्ताव

IPL 2026 Qualifier 1 : गुजरात टायटन्सची पराभवामुळ डोकेदुखी वाढली! शुभमन गिल अन् संघाची झोप उडवणारी बातमी...

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तामिळनाडू सरकारने जाहीर केली पीक कर्जमाफी; 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा, 'थलपती'नं दिलेलं आश्वासन पाळलं

SCROLL FOR NEXT