अकोला

मित्रांच्या वादातून फुटले देशी कट्ट्याचे ‘बिंग’; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील गुन्हेगारी वाढतच आहे. आणखी दोन तरुणांजवळ अवैध विदेशी बनावटीचा देशी कट्टा आढळल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही तरुण मित्र असून, त्यांच्या काही कारणावरून झालेल्या आपसी वादानंतर त्यांच्याजवळील देशी कट्ट्याचे रहस्स उलगडले. या प्रकरणी गुरुवारी (ता. १२) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाला माहिती मिळाली की, चाँद खा प्लॉट, जुने शहर, अकोला येथे राहणारा शेख कासम आणि शेख इलियास ऊर्फ इल्लू हे दोघे जुने शहर हद्दीतील जश्न ए पॅलेस हॉल जवळ उभे आहेत. त्यांच्याजवळ विदेशी बनावटीचा देशी कट्टा आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे आदेशान्वये पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुळकर, अब्दुल माजीद, संदीप तवाडे, मोहम्मद रफी, एजाज अहमद, सुशील खंडारे, सतीश गुप्ता, रोशन पटले, अनिल राठोड, प्रवीण कश्यप यांचे पथकाने केली आहे.

जुने शहर पोलिसांच्या हद्दीत रचला सापळा

एलसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक शैलेस सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सागर हटवार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून शेख इलियास ऊर्फ इल्लू शेख अयाज (२१, रा. देशपांडे प्लॉट, गोरे डॉक्टरचे गल्लीमध्ये, मोगल प्लॉट, जुने शहर) आणि शेख कासम शेख शेखजी (२५, रा. चाँद खॉ प्लॉट, कब्रस्थान मस्जीद जवळ, जुने शहर) यांना ताब्यात घेतले. त्यांचे अंगझडतीमथुन एक विदेशी बनावटीचा देशी कट्टा व मॅग्झीन (किं.अं. २५ हजार) आणि एक जिवंत काडतूस (किं.अं. एक हजार) असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीविरुद्ध जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी आरोपीला जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तरुणांच्या हातात शस्त्र येतात कोठून?

देशी कट्टा आढळून आलेल्या तरुणांचे वय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वयाचे आहे. या तरुणांच्या लेखणी ऐवजी त्यांच्या हातात शस्त्री बघून काळजी करण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरुणांच्या हातात शस्त्र येतात कोठून? कोण त्यांना शस्त्र पुरवितो? त्यांचा ‘गॉडफादर’ कोण, असा प्रश्न पडला आहे. या दिशेनेही पोलिसांनी तपास करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, ४ जणांचा मृत्यू

Sambhaji Nagar : पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही;वरिष्ठांच्या भेटीसाठी प्रमुख पदाधिकारी थेट गाठणार मुंबई

Latest Marathi Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

MHT-CET Exam Result : ‘सीईटी’ निकाल पाहण्यास सर्व्हर डाउनचा फटका!

Praful Patel : विधानसभेत राष्ट्रवादीचा ८५ ते ९० जागांवर दावा; प्रफुल पटेल म्हणाले...

SCROLL FOR NEXT