Dr Babasaheb Ambedkar jayanti Image of Babasaheb from seven thousand books akola
Dr Babasaheb Ambedkar jayanti Image of Babasaheb from seven thousand books akola sakal
अकोला

सात हजार पुस्तकांतून साकारली बाबासाहेबांची प्रतिमा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : श्री मोतिरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा, ता. मंगरूळपीर द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मजलापूर, जि. अकोला येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या भव्य प्रांगणात २६ हजार चौरस फूट एवढ्या भव्यदिव्य आकाराची पुस्तकरूपी प्रतिकृती तयार करण्यात आली. त्यासाठी सात हजार पुस्तके व पाच क्विंटल रांगोळीचा वापर केला. महाराष्ट्रात प्रथमच अशी प्रतिमा साकारल्याचा दावाही आयोजकांनी केला आहे.

संस्था अध्यक्ष सुभाषरावजी ठाकरे (माजी राज्यमंत्री), तसेच चंद्रकांतजी ठाकरे (संस्था सचिव व अध्यक्ष जि. प. वाशीम) यांच्या प्रेरणेतून ही प्रतिमा साकारण्यात आली. या उपक्रमातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकरुपी प्रतिकृती प्राचार्य डॉ. संतोष पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक प्रमोद देहानकर यांच्या संकल्पनेतून व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून साकारण्यात आली. हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रा. सुहासराव नहाटे (अध्यक्ष शाळा समिती यशवंतराव चव्हाण माध्य व उच्च माध्य. विद्यालय), मजलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुचिता पाटेकर (शिक्षणाधिकारी माध्य. जि. प. अकोला) यांची उपस्थिती होती. त्यांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून उपक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संतोष पेठे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, मजलापूरचे सरपंच जनार्धन तायडे व प.स.उपभापती आनंदा डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष शेख नासिर शेख दस्तगीर, अनिल पाटील गावंडे, देवीदास डोंगरे, शाळा समिती सदस्य गणेशराव राळे, प्रा. विजय आठवले फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हाध्यक्ष, श्रीकृष्ण गावंडे केंद्रप्रमुख दापुरा, सुनील नहाटे सर, रजनीताई सुहास नहाटे, रंजनाताई सुनिल नहाटे उपस्थित होते.

पंधरा दिवस घेतले परिश्रम

मजलापूर येथील शाळेतील शिक्षकांनी ही प्रतिमा साकारण्यासाठी १५ दिवस परिश्रम घेतले. पाचवी ते बारावीपर्यंत ३५० विद्यार्थी असलेल्या या शाळेतील अभ्यासक्रमातील पुस्तकं व परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधून पुस्तके जमाकरून हा उपक्रम साकारण्यात आला.

रांगोळीमधून अनेक प्रतिमा सारकारल्या आहेत. मात्र,बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची गोळी लागावी म्हणून पुस्तकरुपी प्रतिमा तयार करण्याचा हा प्रयत्न होता. महाराष्ट्रात प्रथम अशी पुस्तकरुपी प्रतिमा साकारली आहे.

- डॉ. संतोष पेठे, मुख्याध्यापक, यशवंतराव चव्हाण माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, मजलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT