farmer
farmer e sakal
अकोला

मुख्यमंत्री साहेब! आम्ही जगायचं कसं? १२ एकर शेती पेरणीविनाच

सकाळ वृत्तसेवा

वाशिम : पेरणी आटोपून एका महिन्याचा कालावधी उलटला आहे. कुठं बियाण्यांना अंकुर फुटले, तर कुठं पीक तरारू लागले आहे. मात्र, वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर (parditakmor washim) येथील भागवत चौधरी व रूख्मीनीबाई चौधरी या शेतकऱ्याच्या शेतात अजून पेरणी झालीच नाही. शंभर वर्षांपासूनचा वहिवाटीचा रस्ता तार व लोखंडी जाळी लावून बंद केल्याने 12 एकर जमीन पडीक आहे. त्यामुळे आठ जणांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. शासनाकडे केलेल्या अर्ज-विनंत्या तारीख पे तारीख या चक्रात अडकल्याने या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी (cm uddhav thackeray residence) आत्मदहन करण्याची प्रतिक्रिया या शेतकरी कुटुंबाने दिली आहे. (farmer facing problem for sowing his own farm due to government decision in washim)

वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर येथील शेतकरी भागवत चौधरी यांचे आठ जणांचे कुटुंब आहे. त्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. काबाडकष्ट करून पोट भरणाऱ्या या शेतकऱ्यासाठी हा पावसाळा मात्र जगण्याचा प्रश्न घेवून आला आहे. पेरणीच्यावेळी भागवत चौधरी यांच्या शेतातून जाणारा शंभर वर्षापासून वहिवाटीचा रस्ता शेजाऱ्याने तार-जाळीचे कुंपण घालून अडविला. या शेतकऱ्याने तहसिदालराकडे दाद मागितली. त्यानंतर पाहणी करून तात्पुरता रस्ता मोकळा करण्याचा आदेश तहसिलदारांनी बजावला. मात्र, तलाठ्याने अंमलात आणला नाही. त्यानंतर विरुद्ध पक्षाने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पेरणीची वेळ आणि पडीक शेत न बघता तहसीलदाराचे आदेश स्थगित केले. तेव्हापासून या शेतकऱ्याची शेती पडीक आहे. शेजारचे शिवार पिकाने फुलले असताना आपल्या शेतात मात्र काळी माती दिसत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला. आता पोट भरण्यासाठी मुंबई गाठून पोट भरले नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याची प्रतिक्रिया पिडीत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT