अकोला

VIDEO: भाव पडल्याने शेतकरी आक्रमक; खामगाव बाजार समितीमध्ये दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा): बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee Khamgaon) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळं बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले (Groundnut prices fell) असून भुईमुगाला अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज केलेल्या दगडफेकीत (Farmers throwing stones) दोन शेतकऱ्यांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. (Farmers aggressive as prices fall; Stone throwing in Khamgaon market committee)

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. आज केवळ ३२०० रुपये क्विंटलने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याचवेळी विघ्नंसंतोषी लोकांनी शेतकऱ्यांच्या जमावाच्या दिशेने दगड भिरकावले. उत्तरादाखल शेतकऱ्यांनीही दगडफेक केली. त्यामुळे दीपक दसरकर या पोलीसासह उंद्री येथील एक शेतकरी जखमी झाला.

दसरकर यांच्या हातावर दगड लागला. तर शेतकऱ्याच्या डोक्यात दगड लागल्याने त्याचे डोके फुटले. त्याचप्रमाणे तेथील उपहारगृहातील एक जण किरकोळ जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं अतिरिक्त पोलीस कुमक मागवली.

पोलिसांच्या एका पाठोपाठ एक अशा तीन गाड्या बाजार समितीत दाखल होताच, शेतकऱ्यांसह अडते आणि उपस्थितांमध्ये धावपळ उडाली होती. कारवाईच्या भीतीने अनेकांनी बाजार समितीतून काढता पाय घेतला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील अंबुलकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर एसडीपीओ अमोल कोळी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर वातावरण निवळले.

संपादन - विवेक मेतकर

Farmers aggressive as prices fall; Stone throwing in Khamgaon market committee

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT