Farmers from Akola district, led by Shetkari Jagar Manch, will strike in Delhi 2.jpg 
अकोला

अकोला : कृषी कायद्याच्या विरोधात किसान विकास मंच दिल्लीला जाणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला (ता. ०१) जानेवारी २०२१ रोजी किसान विकास मंच व शेतकरी जागर मंचच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीत धडक देणार आहे.

किसान विकास मंच व शेतकरी जागर मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ‘चलो दिल्ली’ आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला किसान विकास मंचचे संयोजक विवेक पारसकर, अविनाश देशमुख यांच्यासह शेतकरी जागर मंचचे जगदीश मुरुमकार, कृष्णा गावंडे, मनोज तायडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, आनंद वानखडे, काँग्रेसचे प्रदीप वखरिया, सागर कावरे, गणेश कळसकर, विलास गोतमारे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने भांडवलदार वर्गाचे हित जोपासण्यासाठी व त्यांना लाभ पोहचविण्यासाठी नवा कृषी कायदा अमलात आणला आहे. भांडवलदारांच्या हितासाठी तमाम शेतकऱ्यांना वेठीस धरून शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप किसान विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीला नेण्याचा किसान विकास मंचचा निर्धार आहे. या दौऱ्यात किसान विकास मंच जिल्हावासियांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चलो दिल्ली किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रारंभ करण्यात आली आहे. किसान विकास मंचच्या या किसान बचाओ दौऱ्या सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे किसान विकास मंच, परफेक्ट स्टडी सेंटर, पारसकर टॉवर, निशु नर्सरी समोर, गोरक्षण रोड, अकोला येथे सकाळी ९ ते रात्री ७ वा पर्यंत नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT