upsc
upsc  sakal
अकोला

अकोला : शेतकरी पुत्राने मारली यूपीएससी परीक्षेत बाजी

श्याम सोनुने

लोणार : आयुष्यात अनेकांनी एकच वाट निवडल्यानंतर त्यात यश- अपयश का पदरी पडते हे माहित नसते. तरी सुद्धा अनेक व्यक्ती रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात. परंतु, स्वतः:ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. असाच आपल्या हिंमतीवर स्वत:ची वाट निर्माण करू पाहणारा तरुण पांडुरंग ज्ञानबा चाटे यांची असिस्टंट कमंडन्ट(Assistant commandant) वर्ग एक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोणार तालुक्यातील गांधारी या छोट्याशा गावखेड्यात ज्याचे बालपण गेले त्या गावाचे नाव आज दिल्लीपर्यंत पोचले आहे. घरात वडील जेमतेम शिकलेले आणि आईला शिक्षणाचा गंधही नाही अशा परिस्थितीत याच खेडेभागातुन आपले शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची जबाबदारी पेलायची असेल तर नोकरी शोधली पाहिजे या हेतूने सुरवात झाली ती आर्मी भरतीच्या तयारीची. नशिबाने पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले आणि तब्बल नऊ वर्ष देशसेवा केली. परंतु, या नऊ वर्षाच्या कालावधीत त्यांचे मन काही रमले नाही.

अंगी बालपणापासूनच असलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आर्मी मधील नोकरी सोडून युपीएससीची तयारी करण्याचे ठाणले. अंगी जिद्द, चिकाटी, आणि प्रचंड मेहनत करण्याची क्षमता ती होतीच. यातूनच चालू झाला तो यूपीएससीच्या वाटेवरचा तो खडतर प्रवास. त्याच दरम्यान वडिलांचे छत्र हरवले. या प्रवासादरम्यान त्यांना खरी साथ मिळाली ती त्याची ताई आणि भाऊजी, त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच जिवलग मित्रपरिवार कारण या प्रवासादरम्यान अनेक अडथळे येत गेले. पूर्वी हाती असलेली चांगली नोकरी सोडली कारण नोकरी मिळणे कठीण असतानाही या अशा परिस्थितीत नोकरी सोडल्याने समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन क्षणात बदलला. (Akola News)

आधीच युपीएससीचा प्रवास खडतर त्यात नोकरी सोडली. त्यामुळे समाजाचे नको ते बोलणे या सर्वांना तोंड देत त्यांचा परिवार त्यांना आधार देत त्यांचे मनोबल वाढवत होते. अशा तब्बल तीन वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांनी अखेर असिस्टंट कमाडन्ट हे पद मिळवले. मनापासुन प्रयत्न केल्यास यश हे मिळतच. भलेही हा शैक्षणिक संघर्ष चालू असताना समाजाच्या अनेक प्रश्नांना आपल्या कुटुंबाला तोंड द्यावे लागले. कारण भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात.

म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते आणि तेव्हाच नव्याने होणार्‍या अपमानांची शल्य बोथट होतात. जिथं संघर्ष नाही तिथे व्यक्ती त्याच्या शेवटाकडे निघून जातो तसेच परिस्थीतीमुळे कधीच आत्मसमर्पण करू नका, खचून जाऊ नका तर समोर पर्वत जरी असला तरी त्यातून मार्ग काढून पुढे चालत राहील पाहिजे. तरुणांनी निर्णय घेताना पसीने की शाई से जो लिखते है, इरादे को उसके मूक्कदर के पन्ने कभी कोरे नही होते अशा शब्दात आपल्या भावना पांडुरंग चाटे यांनी सकाळसोबत बोलताना व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT