washim accident news washim accident news
अकोला

लग्नावरून परतताना घातला काळाने घाला; एकाच कुटुंबातील चार जण ठार

एकाच कुटुंबातील चार जण ठार; एकाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

वाशीम : शेलू-वाशीम मार्गावर सोयता फाटा येथे मंगळवारी (ता. १५) रात्री झालेल्या अपघातात वाशीम तालुक्यातील सावंगा जहागीर या गावातील गवई कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले. या घटनेने बुधवारी (ता. १६) सावंगा गावात शोककळा पसरली आहे. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात चौघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. गवई कुटुंबात आता अपघातातील मृत भारत गवई यांची वयोवृद्ध आईच केवळ मागे राहिली आहे.

मंगळवारी रात्री रस्त्याच्या (Road Accident) कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मॅक्झिमो या वाहनाने धडक दिली. त्यात गवई कुटुंबातील चार जण भारत गवई, त्यांची पत्नी पूनम, मुलगा सम्राट व मुलगी आकांक्षा हे चौघे व अन्य एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आणि सात जण गंभीर जखमी झालेत. या अपघाताची माहिती मिळताच डोंगराच्या कुशीत वसलेले चार हजार लोकवस्तीचे हे गाव मंगळवारी रात्रीच मिळेल त्या साधनाने गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गावरील सोयता फाट्यावर गेले.

तेथील परिस्थिती पाहून एकच आक्रोश सुरू झाला. एकच आक्रोश आभाळभर पसरला. रात्रभर गावात उसासे अन् किंकाळ्या अपघातील जखमींवर अंत्यसंस्कार होईपर्यंत ऐकू येत होत्या. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी (police) मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. रात्रभर गावाने जागून काढली. बुधवारी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह गावात आणल्यानंतर आक्रोश आभाळभर झाला. शोकाकुल वातावरणात चार जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसर हळहळला.

सोयता येथील पोलिस पाटील सुधाकर गंगाराम राऊत यांनी पोलिस ठाण्यात अपघाताची तक्रार नोंदवली. मॅक्झिमो रस्त्यावर उभ्या असलेल्या (Road Accident) ज्या ट्रॅक्टरवर (एमएच ३७ ए९२८७) आदळली, त्या ट्रॅक्टरचा चालक दीपक देवराव भालेराव (रा. तांदळी) याला जऊळका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातस्थळावरची स्थिती अतिशय भयावह होती.

याचवेळी तेथून मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा अध्यक्ष माधवराव अंभोरे, नंदकिशोर शिंदे, शिवसेनेचे वाशीम तालुका प्रमुख रामदास मते पाटील हे वाशीमकडे जात होते. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली व जऊळका पोलिसांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आणि जखमींना वाशीम रुग्णालयात हलविण्यात मदत केली. जखमींची गंभीर स्थिती पाहता त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

पुन्हा हादरले गाव

चार जणांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर गाव दु:खाचा आवंढा गिळत नाही. तोच याच अपघातात जखमी झालेला विशाल अशोक पट्टेबहादूर या २२ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी गावात धडकली. पुन्हा गावात एकच आक्रोश झाला. विशालवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातील आणखी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असल्याने गाव सुन्न झाले आहे.

धाय मोकलून रडली माय

अपघातात मृत्यू पावलेल्या भारत गवई यांच्या कुटुंबात वयोवृद्ध आई एकटीच मागे राहिली आहे. ६७ वर्षीय गंगूबाई गवई यांची अवस्था बिकट झाली होती. मुलगा, सून, नात-नातू यांचे मृतदेह पाहून वृद्ध मातेने फोडलेला टाहो आसमंत भेदून गेला.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

एसटी सेवा बंद (St Strick) असल्यामुळे मेक्झिमोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. त्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू झाले. पोलिसही घटनास्थळावर दाखल झाले. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

गाव झाले सुन्न आक्रोश आभाळभर

सावंगा येथील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती सावंगा जहांगीर गावाला कळताच गावात एकच आक्रोश झाला. चिमुकलीसह कुटुंबच अपघातात ठार झाल्याने रात्रभर गावात आक्रोश होता. बुधवारी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर चारही मृतदेहांवर शोकाकुळ वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसर हळहळला होता. गवई कुटुंबातील मृत भारत गवई यांची वयोवृध्द आई मागे राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking : कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मध्येच बाहेर करणे पडले महागात, आयसीसीने दिला दणका...

Thane News: पाणी टंचाईच्या झळा, पण बेकायदा वॉशिंग सेंटरमधून सर्रास पाण्याची उधळपट्टी, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

Ozar News : पोलीस बनले समुपदेशक! नाशिकमध्ये अपहरणाचा बनाव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलिसांनी केले समुपदेशन, पालकांना दिला योग्य सल्ला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित महिलांच्या दावेदारीची चर्चा

Nashik Crime : नाशिकमध्ये 'एमडी' तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल.

SCROLL FOR NEXT