Hindustani Bhau agitation Student protest offline exam Oppose sakal
अकोला

अकोला : हिंदुस्थानी भाऊने पेटवले आंदोलन; विद्यार्थी उतरले रस्त्यावर

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑफलाईन परीक्षांना विरोध

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी सोमवारी (ता. ३१) रस्त्यावर उतरले. अकोल्यात सुद्धा दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी विद्यार्थ्यांची वाढती गर्दी पाहता पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून परत न गेल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजुत काढली व त्यांना परत पाठवले. दरम्यान राज्यभर हिंदुस्थानी भाऊंच्या आवाहनवर विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने त्याचे परिणाम अकोल्यातही दिसून आले.

दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांकडून पुणे, नागपूरसह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, दहावी बारावी बोर्ड परीक्षा एक महिनाभर आलेली असताना दहावी, बारावी बोर्ड परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.त्यामुळे याविषयी हिंदुस्थानी भाऊंच्या आवाहनावर विद्यार्थ्यांनी आक्रमक होत सोमवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. वर्षभर ऑनलाइन शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या, असे विद्यार्थी म्हणाले. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळ घातल्याची माहिती पोलिसांना मिळताच सिटी कोतवाली पोलिस याठिकाणी दाखल झाले.

त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांमध्ये शरविन राऊत, आयूष भोजने, ऋषिकेश आढावू, अथर्व बडोदे, शिवम शर्मा, आदेश एकंडे यांच्यासह इतरांचा समावेश होता.

ऑफलाईन परीक्षेला विरोध

आंदोलक विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. त्यामध्ये तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका असे सांगत, दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान - युएई सामना होणार? आता PCB ने केली मोठी विनंती; खेळाडू स्टेडियमकडे रवाना

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

Chhatrapati Sambhajinagar News : आमदार विलास भुमरे प्रभारी जिल्हाप्रमुख; पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघांची दिली जबाबदारी

Kedarkheda Accident : देऊळगाव ताड येथील नामदेव गाडेकर यांचा बसच्या धडकेने मुत्यु

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

SCROLL FOR NEXT