अकोला

शेगाव पॅटर्न पंढरपूरला राबविला तर ९० हजार भाविक घेतील दर्शन

सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि.अकोला) ः कोरोना संकट काळात देवदर्शनासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने राबविलेला दर्शन पॅटर्न आषाढ वारीत पंढरपूरला राबिल्यास ९० हजारांवर भाविक दर्शन घेवू शकतील. त्यामुळे या ऑनलाइन नोंदणी करून दर्शनाची व्यवस्था करण्याचा पॅटर्न पंढरपुरात राबविण्याची मागणी वारकऱ्यांनी राज्य शासनाकडे केली आहे. (If Shegaon pattern is implemented in Pandharpur, 90,000 devotees will take darshan)


कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्वच देवस्थान बंद आहेत. भाविकांना ओढ लागली आहे ती पंढरपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनाची. आषाढी वारीमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असे कारण सांगून सरकारने मंदिर बंद ठेवले आहे.पण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व सरकारने मनात आणले तर पूर्ण महिन्यात कमीत कमी ९० हजार भाविक दर्शन घेऊ शकतील. शेगाव येथील गजानन महाराज संस्थानमध्ये एका दिवसात तीन हजार भाविकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन दिल्या जात होते आणि ही प्रक्रिया सर्व ऑनलाईन असल्यामुळे ज्या भाविकांचा दर्शनाचा नंबर आहे तो भाविक त्या तारखेला ठराविक वेळेवर तिथे उपस्थित राहत होता.

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीने ठरविल्यास शेगाव पॅटर्न राबवून भाविकांना दर्शन द्यायचे आहे आणि सरकारने जर पुढाकार घेऊन होकार दिला तर एका दिवसाला तीन हजार भाविक म्हणजे तीस दिवसांमध्ये ९० हजार भाविक कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घेऊ शकतात. या नियोजनाने पंढरपूरमध्ये गर्दी होणार नाही. दररोज तीन हजार भाविक जर पंढरपूरमध्ये दर्शनाला आले तर जे छोटे-मोठे व्यावसायिक आहेत त्यांनाही उपजीविकेचे साधन प्राप्त होईल.

गेले दोन वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे देवस्थानला फार मोठी आर्थिक झळ पोहोचलेली आहे. भाविक दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला येत राहिले तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला आर्थिक स्वरूपात फार मोठी मदत होऊ शकते. जे भाविक पंढरपूरमध्ये येतील त्यांच्याजवळ कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय त्यांना प्रवेश टाळावा, असे मत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

If Shegaon pattern is implemented in Pandharpur, 90,000 devotees will take darshan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: शत्रूपक्षातील सौहार्द! संजय राऊतांची प्रकृती बिघडली; नरेंद्र मोदींचा ‘गेट वेल सून’ संदेश, खासदारांनी दिलं भावनिक उत्तर

Women’s World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला किती कोटींचं बक्षीस मिळणार? ICC ने केलीय मोठी घोषणा

SSC HSC Exam Time Table : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोप

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT