If you are advertising Akola Marathi News power pole, action will be taken! 
अकोला

सावधान; वीजेच्या खांबाला जाहिरात लावत असाल तर कारवाई होणारच!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : आजचे युग स्पर्धेचे आहे. यात वावरताना प्रत्येक गोष्टीची, वस्तूची प्रसिद्धी करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी कामी येते ती जाहिरात! जाहिरात आणि प्रसिद्धीला आज प्रचंड महत्त्व आले आहे. कोणतीही सेवा किंवा उत्पादन विकताना उत्पादकांना/निर्मात्यांना त्याची प्रभावी जाहिरात करणे गरजेचे वाटू लागले आहे. यातूनच अनेकांना जाहिरातीचे जग खुणावू लागले आहे.

मात्र, असे असले तरी महावितरणने याला वारंवार विरोध केला आहे. बरेचदा आवहन केल्या जाते. प्रसंगी व्यावसायिकास नोटीसही बजावल्या जाते.

अकोला येथे महावितरणच्या आवाहनाला तसेच महावितरणने कायदेशीर नोटीस देऊनही महावितरणच्या मालमत्तेवरील देव कमल हॉस्पीटलची जाहिरात फलके न काढल्याने महावितरण शहर विभागाच्यावतीने संबंधित हॉस्पीटलचे डॉ. आशीष तापडीया यांच्यावर शासकीय मालमत्तेचा अवैध वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

शहरातील वीज खांब, रोहित्रे, फीडर पीलर, डी.पी. इत्यादी महावितरणच्या यंत्रणेवर किंवा यंत्रणेच्या अगदी जवळ, खाली अनेक संस्था, व्यावसायीक, जाहिरातदारांनी आपल्या प्रचार प्रसिध्दीसाठी अनाधिकृत फलके, पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग लावले होते. या प्रचार, प्रसिध्दी साहित्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट होणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते.

याचा सर्वात मोठा अडथळा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज जाळ्यांची देखभाल दुरूस्ती करताना होत होता, काही ठिकाणी यामुळे अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहे. असे प्रकार टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने अवैधरित्या लावलेली फलके,पोस्टर्स संबंधितांना काढण्याचे आवाहन केले होते. त्यासोबतच संबंधितांना नोटीस सुद्धा बजावली होती. परंतु जठारपेठ रतनलाल प्लॉट रोडवरील महावितरणच्या मालमत्तेवर ‘देवकमल हॉस्पीटलच्या’ जाहिरातीबाबत संबंधित हॉस्पीटल प्रशासनाने महावितरणच्या आवाहनाकडे पुर्णता दुर्लक्ष केल्याने महावितरण प्रशासनाने संबंधित हॉस्पीटलचे डॉ. आशिष तापडीया यांच्यावर विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेच्या विदृपणास प्रतिबंध करण्याकरिता असलेले अधिनियम १९९५ अंतर्गत पोलिस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यापुढे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तीव्र करण्यात येत असल्याने ज्या जाहिरातदारांनी आपली प्रचार साहित्ये काढली नाही त्यांनी काढून घ्यावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...

IPhone 17 Crowd: आयफोन १७ विक्री सुरू; बीकेसीच्या स्टोअरबाहेर तुफान गर्दी, रांगेत धक्काबुक्की अन् हाणामारीचा थरार!

RBI Recruitment 2025: रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड-बी ऑफिसर पदासाठी १२० जागांची भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT