It has rained hailstorms in Bhadgaon area.jpg
It has rained hailstorms in Bhadgaon area.jpg 
अकोला

भडगाव परिसरात वादळीवार्‍यासह गारपीट

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (बुलडाणा) : परिसरातील चांडोळ, इरला, ढंगारपूर, सावळी, रुईखेड, मोहोज, भडगाव, पिंपळगाव (सराई), ढासाळवाडी व घाटनांद्रा या गावांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस व तुरळक ते मध्यम स्वरूपाची साधारणपणे बोरा एवढ्या आकाराची गारपीट झाली.

वादळी वार्‍यात पपई फळाचा मळा उद्ध्वस्त
 
वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून व फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. बहुतांशी रब्बी पीक काढले गेले असल्याने जास्त नुकसान झाले नाही. मात्र शेतात उभ्या असलेल्या कांदा पिकाचे अंशतः नुकसान झाले. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

कोरोना संकटामुळे आधीच जीव मेटाकुटीस आला असून अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आता हा वादळी वारा व गारपीटसह पडलेल्या पावसामुळे भाजीपाला व कांदा पिकाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कांदा व भाजीपाला उत्पादकवर्ग हवालदिल झाला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT