MLA Sanjay Gaikwad informed that the proposal for extension of Buldana city boundary is in the final stage 
अकोला

बुलडाणा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : बुलडाणा नगरपालिकेत समाविष्ट करावयाच्या आसपासच्या गावाबाबतच प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याला मान्यता मिळेल, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान मतदारसंघातील प्रश्‍नांबाबत श्री. गायकवाड पत्रकारांशी बोलत होते. बुलडाणा शहराची हद्द वाढावी व आसपासच्या गावांना शहरांमध्ये सामावून घ्यावे, असा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आपण पुढाकार घेऊन या प्रस्तावाला चालना दिली असून नगर विकास विभागामार्फत या प्रस्तावामध्ये या त्रुटी दूर करून तो आता अंतिम टप्प्यात आला असल्याने आगामी काळात लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन शहराची हद्द वाढणार आहे. त्यामुळे पर्यायाने नगर पालिकेच्या उत्पन्नात भर पडून परिसरातील गावांमध्ये ही विकास कामे व सुविधा पोचविता येणार आहेत. वास्तविक पाहता बुलडाणा शहराचा विस्तार वाढत असताना आसपासच्या सागवान, सुंदरखेड, येळगाव, माळविहीर, जांभरून, सावळा व हनवतखेड या गावांच्या सीमा शहराला टेकल्या आहेत.

सुंदरखेड, येळगाव, सागवान, माळविहीर, जांभरून, हनवतखेड या परिसरात अनेक मोठमोठी बांधकामे, फ्लॅटस्कीम तयार झालेले आहेत. वास्तविक पाहता ही सर्व जागा शहराला लागून असल्याने व परिसरातील नागरिक सगळ्या सुविधा घेत असल्याने सर्व सुविधा नागरी परिसरातल्या परंतु कर मात्र ग्रामपंचायतीचा अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. आगामी काळात या सर्व ग्रामपंचायती बुलडाणा शहरामध्ये समाविष्ट झाल्यास नगरपालिकेची हद्द वाढून आणखी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार असल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT