https://www.esakal.com/akola/it-has-rained-hailstorms-bhadgaon-area-421828 
अकोला

गारपिटीने कांदा पिकाचे मोठे नुकसान; कृषी सेवकांसह पदाधिकार्‍यांनी घेतली नुकसानग्रस्त भागात धाव

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (बुलडाणा) :  तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने शेडनेट आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एका महिन्यात दुसर्‍यांदा वादळ वार्‍यासह झालेल्या गारपिटीने शेतकर्‍यांचा कंबरडे मोडले आहे. दरम्यान झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिसेवकांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त शेतात धाव घेतली आहे.

वादळी वार्‍यात पपई फळाचा मळा उद्ध्वस्त
 
तालुक्यात गारपिटीने गहू, हरभरा, ज्वारी आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची शासनाकडून अद्याप भरपाई मिळाली नाही. परिणामी हातातोंडाशी आलेला पीक उत्पादन गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात होता. अशातच महिनाभरात दुसर्‍यांदा वादळी वार्‍यासह गारपीट झाल्याने काढणीस आलेला गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुरा सरंबा, किन्ही पवार, पिंपळगाव चिलमखा, पांगरी माळी भागात सुसाट वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यातच काही ठिकाणी गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले तर कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पांगरी माळी येथे मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेडनेट जाळी फाटून शेडनेट शेती करणार्‍या अनेक शेतकर्‍यांचे सीड पिके उद्ध्वस्त झाली असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सुरा सरंबा, नारायणखेड येथे झालेल्या कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी कृषी विभागाचे कृषी सेवक श्री. म्हेत्रे, राष्ट्रवादीचे नेते राजू चित्ते, युवक तालुकाध्यक्ष गजानन चेके, बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू सिरसाट यांनी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. झालेल्या नुकसानी बद्दल पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, तहसीलदार सारिका भगत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. दरम्यान पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे निर्देश महसूल व कृषी विभागात दिले आहे. सुरा, सरंबा, नारायणखेड परिसरात नुकसानीची पाहणी करताना सरपंच सोपान चेके, शिवाजी चेके, समाधान चेके यांच्यासह शेतकर्‍यांची उपस्थिती होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT