Plot sale in Akola Marathi News MIDC through forged documents 
अकोला

एमआयडीसीमध्ये होतेय बनावट दस्तऐवजाद्वारे भूखंड विक्री

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : एमआयडीसी वाहतूक नगरातील एमआयडीसी प्रशासनाच्या ताब्यातील भूखंडाचे बनावट दस्तऐवज तयार करून विकणाऱ्या मो. इब्राहिम मो. अजीज (रा. मुजफ्फरनगर) नामक दलालाला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या भूखंड घोटाळ्यातील बनावट दस्तऐवज तयार करणारा ॲड. राजेश पांचोली आणि त्याचा भाऊ यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली. 


प्राप्त माहितीनुसार, अकोला एमआयडीसी ट्रान्सपोर्ट नगरातील टीए ७८ भूखंडाचे बनावट कागदपत्रे बनवून, शासकीय प्लॉट विकण्यात आला होता. या भूखंडाचे बनावट कागदपत्रे ऑगस्ट २०१७ मध्ये तयार करून, डिसेंबर २०१७ मध्ये अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयाला आग लावून पुरावे नष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी प्लॉट ऑनर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश काबरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई (अंधेरी) येथे केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवार, ता. ४ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आलेल्या मो.इब्राहिम मो.अजिज याला न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय सोनोने करीत आहेत.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

चौकशीतून पितळ उघडे
चौकशीअंती या भूखंडावर बेकायदेशीर ताबा मिळवून, हा प्लॉट मौजी नामक उद्योजक यांना विकण्यात आला होता, अशी माहिती समोर आली होती. यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी अमरावती परिक्षेत्र अधिकारी यांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तक्रार देऊन, अकोला एमआयडीसी पोलिस ठाण्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

दोषी कर्चमारी निलंबित
या प्रकरणात दोषी कर्मचारी अविनाश चंदन, पुरुषोत्तम पेठकर, एरिया मॅनेजर ठोके यांना निलंबित करण्याचे आदेश १४ फेब्रुवारी २०१९ रोजी देण्यात आले होते. त्यानुसार, या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१९च्या रात्री १२.१० वाजताच्या सुमारास हे कर्मचारी आणि तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा वासनिक व सेवानिवृत्त क्षेत्र व्यवस्थापक दिलीप झेंडूजी पाटील तसेच अकोला शहरातील व्यावसायिक विक्रम शहा यांच्या पत्नी कृपा शहा यांना अटक करण्यात आली होती. हे पाचही आरोपी जामिनावर आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT