अकोला

मेहकर येथे खोदकामात सापडलेल्या मंदिराचे अवशेष बाराव्या शतकातील

सकाळ वृत्तसेवा

मेहकर (जि.बुलडाणा) : भगवान शारंगधर नगरी मेहकर ही ऐतिहासिक वास्तू साठी प्रसिद्ध आहे. शहरात कंचणीचे महाल, भगवान शारंगधर बालाजी मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि अश्यातच येथील फैजलापूर शेत शिवारात 27 मे रोजी अनिल इंगळे यांच्या शेता लगत नाल्याचे खोलीकरण व रुंदीकारणाचे काम सुरू असताना मंदिराचे अवशेष व भग्न अवस्थेत मुर्त्या, नंदी असे अवशेष सापडले होते. याची माहिती पुरातत्व विभाग नागपूर यांना दिल्याने पुरातत्व विभागाने त्याची पाहणी करून या अवशेषांचे उत्खनन होणे गरजेचे आहे असे मत मांडले.  (Remains of a temple found in excavations at the historic Buldana Mehkar date back to the 12th century)

मेहकरमध्ये कित्येक जुन्या वास्तू आहेत ज्यांचे उत्खनन व संवर्धन होणे गरजेचे असतांनाच येथील फैजलापूर शेत शिवारात असलेल्या अनिल इंगळे यांच्या शेता लगत असलेल्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम 27 मे रोजी सुरू होते ज्यात खोदकाम करतांना त्या ठिकाणी भग्न अवस्थेत असलेल्या मुर्त्या, सभा मंडपाचे दगडी कोरीव पिल्लर, नंदीची मूर्ती असे अवशेष सापडले होते ज्याची माहिती तहसीलदार संजय गरकल यांना मिळाल्यावर त्यांनी स्थळ निरीक्षण करून पुरातत्व विभाग नागपूर यांना संपर्क साधून त्या ठिकाणचे फोटो पुरातत्व विभागाला पाठविले होते.

ज्यावर पुरातत्व विभागाने खोदकाम बंद करायला लावून 31 मे रोजी मेहकर येथील मंदिराचे अवशेष सापडले होते त्या ठिकाणी भेट दिली, पाहणी केली. या वेळी सहायक संचालक जया वहने यांनी सांगितले की, हे अवशेष बाराव्या किंवा तेराव्या शतकातील असू शकतात या ठिकाणी नदी वाहत असेल व नदीच्या प्रवाहाने मंदिर ढासळले असेल आणि कालांतराने ते अवशेष जमिनीत गाडल्या गेले असे मत व्यक्त केले या ठिकाणी उत्खनन करणे गरजेचे आहे. उत्खननानंतर सर्व काही बाहेर येईल या ठिकाणी उत्खनन साठी लागणारी परवानगी ही पुरातत्व विभाग मुंबई यांच्या कडे प्रस्ताव पाठवून घेतली जाईल.मेहकर येथील कंचणीचे महाल,बारव,घुमट इत्यादी पुरातन वास्तू या विभागाच्या अधिकार्‍यांनी पहिले.

पुरातत्व विभाग नागपूर चे जया वहाणे सहायक संचालक पुरातत्व विभाग, निकेश खुबाडकर यांनी भेट दिली तेव्हा आ.डॉ.संजय रायमुलकर, तहसीलदार संजय गरकल, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकार, निरज रायमुलकर, नगरसेवक माधव तायडे, नगरसेवक ओम सैभागे, तलाठी माधवराव गायकवाड, तलाठी लक्ष्मण सानप मंडळ अधीकारी रामराव चनखोरे, विशाल राऊत हे हजर होते.

आ.डॉ.संजय रायमूलकर यांनी पुरातत्व विभागाशी चर्चा करताना सगीलते की मेहकर मधील पुरातन वास्तूंचे संवर्धन गरजेचे आहे. त्याची पाहणी पुरातत्व विभागाने करावी तसेच जे मंदिराचे अवशेष सापडले आहे. त्याचे उत्खनन करावे ज्याने मेहकर नगरीचा वैभवशाली इतिहास जनतेसमोर येईल उत्खनन साठी जो निधी लागेल त्या साठी मी प्रयत्न करून निधी मिळवून देईल, असे स्पष्ट केले. मेहकर मधील बारव,कंचणीचे महाल,घुमट अश्या कित्येक वस्तू दुर्लक्षित आहेत ज्याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देऊन त्याचे संवर्धन करावे असे मत तहसीलदार डॉ संजय गरकल यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांसमोर मांडले.

संपादन - विवेक मेतकर

Remains of a temple found in excavations at the historic Buldana Mehkar date back to the 12th century

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT