Saint Chokhoba  sakal
अकोला

संत चोखोबा प्रमाणे त्यांच्या नावाचा पुरस्कार ठरला उपेक्षित

तीन वर्षांपासून घोषणा नाही, सामाजिक न्याय मंत्रालय झोपेत

मुशीरखान कोटकर

देऊळगाव राजा : बाराव्या शतकातील विद्रोही संत चोखामेळा(Chokhamela) यांच्याप्रमाणेच त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासना तर्फे दिला जाणारा संत चोखामेळा सामाजिक पुरस्कार ही उपेक्षितच ठरला आहे युती शासनाच्या काळात पहिले दोन वर्ष पुरस्कार जाहीर केल्यानंतर गत तीन वर्षापासून कोरोनाचे (Corona)कारण पुढे करून चोखामेळा पुरस्काराची घोषणा शासनाने केली नाही परिणामी आयुष्यभर विठूरायाच्या भेटीची ओढ अपूर्ण राहिलेल्या उपेक्षित संताच्या नशिबी मरणानंतर ही उपेक्षा आली सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार थांबविला परिणामी खंडित पडलेल्या संत चोखामेळा सामाजिक पुरस्कार उपेक्षित संत चोखोबा (Saint Chokhoba) प्रमाणे उपेक्षित ठरला आहे.

दहन करा व दफन करा ति कुशीत घेते, माती काही जात पुरावा मागत नाही, या ओवी जरी सत्य आणि नैसर्गिकते आधारित असल्या तरी बाराव्या शतकात समाजातील भेदभावाने संत चोखामेळा यांना आयुष्यभर ग्रासले होते विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या मात्र मागासलेल्या समाजात जन्मलेले चोखोबा संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत जनाबाई,संत नरहरी सोनार व संत सावता माळी यांच्या सहवासी संत असूनही सामाजिक दृष्टिकोनातून उपेक्षितच राहिले देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुनपुरी आताचे मेहुणा राजा येथे जन्मलेल्या या महान संताच्या नावाने तत्कालीन भाजप-शिवसेना युती शासनाने संत चोखामेळा सामाजिक पुरस्कार या नावाने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली २०१७ यावर्षी प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांना पहिला संत चोखामेळा सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर दुसऱ्या वर्षी नागपूर येथील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार तुषार सूर्यवंशी यांना चोखामेळा पुरस्काराची घोषणा करण्यात आली युती शासनाचा शेवटचं वर्षी चोखामेळा जन्मोत्सव १४ जानेवारी च्या पूर्व संध्य पर्यंत पुरस्काराची घोषणा होईल अशी अपेक्षा होती संत चोखोबा इतिहासाचे अभ्यासक तसेच खडकपूर्णा प्रकल्पाचे संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प असे नामकरणासाठी लढा दिलेले तालुक्यातील विचारवंत प्रा कमलेश खिल्लारे यांच्या नावाने हा पुरस्कार जाहीर होईल अशी जनभावना होती मात्र पुरस्काराची घोषणा हवेत विरली तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना संत चोखामेळा सामाजिक पुरस्काराचा विसर पडला तदनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले यूती सरकारच्या काळातील एक वर्ष व महाआघाडी सरकारची दोन वर्ष अशा तीन वर्षापासून सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत दिला जाणारा संत चोखामेळा सामाजिक पुरस्कार खंडित झाला आहे परिणामी आयुष्यभर उपेक्षित राहिलेल्या विद्रोही संत चोखामेळा यांच्या नावाने राज्य शासनामार्फत दिल्या जाणारा संत चोखामेळा सामाजिक पुरस्कारही उपेक्षीत ठरला आहे.(Chokhamela news)

मधल्या काळात कोवीड मुळे शासनातर्फे दिले जाणारे जे काही पुरस्कार थांबले होते येत्या दोन महिन्यात दोन्ही वर्षाचे पुरस्कार जाहीर होणार आहे सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जाणारे पुरस्कार ही लवकरच जाहीर करू- धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या अभंगा च्या माध्यमाने विठोबाची भक्ती मांडणारे संत चोखामेळा हे महान संत होते त्यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार देऊन शासनाने सन्मानित केल्याचा मला अभिमान आहे सामाजिक न्याय विभागाने हा पुरस्कार खंडित न करता समाजात सकारात्मक दृष्टी या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी चोखामेळा पुरस्काराने सन्मानित करून चोखामेळा जन्मोत्सवा दिनी चोखा भक्तांचा आनंद द्विगुणीत करावा.(Akola news)

- सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT