File photo 
अकोला

शेतकऱ्यांची फसवणूक करून होतेय बी-बियाणे व खतांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा ः बियाण्यांची अवैध विक्री, साठवणूक , लिंकिंग, पावतिवर जबाबदारी झटकण्याचा शिक्का मारणे महाबीज यांच्यासोबत इतर बियाणे घेण्याची अट घालने आदी कारणांवरून तेल्हारा तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला असून, एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर पाच जणांना ताकिद देण्याची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक यांच्या सुनवाईदरम्यान करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘सकाळ’ने बियाणे विक्रीत शेतकऱ्यांची होत असलेल्या अडवणुकीच प्रकाश झोतात आणली होती. (Sale of seeds and fertilizers by deceiving farmers)
अवैधरीत्या बियाणे खते विक्री, अवैद्य साठवणूक, शेतकऱ्यांच्या इतर तक्रारीवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातिल सात कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्राचा बियाणे परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे.

या केंद्राने शेतकऱ्यांच्या देयकांवर शिक्का मारून सोयाबीन विक्रीची जबाबदारी झटकली होती. तेल्हारा येथील दधिमती कृषी सेवा केंद्राचा बियाणे परवाना रद्द करण्यात आला आहे. पुष्कर ॲग्रो एजन्सी तेल्हारा ,यश कृषी सेवा केंद्र दानापूर, सद्गुरू कृषी सेवा केंद्र दानापूर, महालक्ष्मी सीट्स तेल्हारा, सरिता कृषी सेवा केंद्र तेल्हारा यांना ताकिद देण्यात आली आहे.


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ता. १४ जूनला केलेल्या सुनवाई नुसार दोषी आढळलेल्या या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. कपाशीचे बियाणे मुदतीपूर्वी विकल्याप्रकरणी व लिकिंगच्या तक्रारीवरून अनुदानावरील बियाणे अवैधरित्या विक्री केल्याप्रकरणी सोयाबीन बियाणे दुसऱ्या जिल्ह्यात विकल्याप्रकरणी बियाण्यांची जबाबदारी नसल्याचे बिलावर शीक्का मारल्याप्रकरणी व खतांचा जुना साठा केल्याप्रकरणी या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली.

संपादन - विवेक मेतकर

Sale of seeds and fertilizers by deceiving farmers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT