कोविशिल्ड लस
कोविशिल्ड लस Media Gallery
अकोला

18 वर्षावरील लाभार्थ्यांना दुसरा डोस उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः राज्य शासनाने १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला तूर्तास ब्रेक लावला आहे. असे असले तरी गत महिन्यात पहिला डोस घेणाऱ्या या वयोगटातील लाभार्थ्यांना मंगळवार (ता. ८) पासून कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासोबतच ४५ वर्षावरिल लाभार्थ्यांना सुद्धा पहिला व दुसरा डोस नियमित प्रमाणे लसीकरण केंद्रांवर देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी दिली. (Second dose for beneficiaries above 18 years of age in Akola from tomorrow)

वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचे १ मेपासून लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भरतीया रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय (डाबकी रोड), आर.के.टी. आयुर्वेद कॉलेज जठारपेठ आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे सुरुवातीच्या काळात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

त्यानंतर राज्य शासनाकडून लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर या वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यात आली. परंतु त्यानंतर ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी दुसरा डोस देण्यासाठी लस उपलब्ध नसल्याने राज्य शासनाने १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी शासकीय लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया बंद आहे. परंतु संबंधित लाभार्थ्यांना लस घेवून २८ दिवस झाल्यामुळे त्यांना आता मंगळवारपासून दुसरा डोस देण्यात येणार आहे.



७ हजार ३०० लाभार्थ्यांनी घेतली होती लस
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील ७ हजार ३०० लाभार्थ्यांनी कोरोनाचा पहिला डोस मे महिन्यात घेतला होता. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना आता दुसरा डोस देण्यात येईल. त्यासाठी ७ हजार ३०० डोसचा उपयोग करण्यात येईल.


ऑनलाईन नोंदणी आवश्यक
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू होईल. त्यामुळे लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Second dose for beneficiaries above 18 years of age in Akola from tomorrow

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

आजचे राशिभविष्य - 12 मे 2024

Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

Hail Warning : पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा ; कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशांपर्यंत खाली

Jat-Sangola Road Accident : कामासाठी जाणाऱ्या महिलांच्या जीपला भीषण अपघात; 3 महिला ठार, तर 10 जण जखमी

SCROLL FOR NEXT