गहू, तांदूळ वाटप  sakal
अकोला

Akola News : महिनाभरात करावे लागणार धान्याचे वाटप!

पुरवठा विभागाची रेशन दुकानदारांना नोटीस; ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात न्या

सकाळ वृत्तसेवा

अकोला : लाभार्थ्यांना धान्य देणात दिरंगाई करणाऱ्या रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाने नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात रेशन दुकानातून वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत व लाभार्थ्यांना सुद्धा त्याच महिन्यात धान्य उचल आवश्यक केली आहे. त्यामुळे धान्य वाटपात दिरंगाई होणार नाही व लाभार्थ्यांना सुद्धा वेळेवर धान्य मिळेल.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील हजाराे गाेरगरीबांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लाेकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते.

सदर धान्य हे लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळत असल्याने त्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांना होतो. अनेक लाभार्थी कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सवलतीच्या दरातील धान्य वाटपाला अतिशय महत्त्व आहे. या धान्य वाटपाचे प्रमाण शासनाने निश्चित केले आहे.

त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डवर २० किलो गहू व १५ किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते. परंतु, रेशन दुकानदार लाभार्थ्यांना वेळेवर धान्याचे वाटप करत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत.

याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने जवळपास २५ धान्य दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता अशा प्रकारावर आळा बसावा यासाठी ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात नेण्याच्या सूचना पुरवठा विभागाने केल्या आहेत.

अनियमितता सुद्धा थांबणार

पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील बहुतांश रेशन दुकानदारांना प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा सुरुवातीलाच धान्याचा पुरवठा करण्यात करण्यात येते. परंतु, रेशन दुकानदार लाभार्थ्यांना वेळेवर धान्य देत नाहीत. काही दुकानदार लाभार्थ्यांच्या अज्ञानतेचा फायदा घेत धान्य देण्यास कात्रीही लावतात. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी पुरवठा विभागाने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Nashik Leopard Sighting : नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक तब्बल 3 बिबटे? 10 वीच्या विद्यार्थ्याने कॅमेऱ्यात कैद केला थरार; पण वन विभाग म्हणतंय...

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ चा ऑरेंज कॅप विजेता वैभव सूर्यवंशी कसा बनला 'रन मशीन'? बालपणीच्या कोचने उघड केला 'तो' कठीण प्रवास!

SCROLL FOR NEXT