Guardian Minister Bachchu Kadu 
अकोला

वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्याच्या उपाययोजना करा

विवेक मेतकर

अकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वन्यप्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतीत शिरुन पिकांचे नुकसान करत असतात. परिणामी शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी येथे दिले.

ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपवनसंरक्षक विजय माने,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलवडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची वारंवारता अधिक असणाऱ्या ठिकाणांची माहिती देण्यात आली. वन्य प्राणी हे अधिवास क्षेत्रातून शेतात येऊन पिके फस्त करतात किंवा रानडुकरे, रोही सारखी जनावरे पिके उध्वस्त करतात. त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना जसे कुंपण करणे, चर खोदणे आदी  करण्यात याव्या. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

यावेळी पालकमंत्र्यांनी खारपाणमुक्त गाव प्रकल्प आराखड्याचा आढावा घेतला. तसेच राजनापूर खिणखीणी या दत्तक गावातील विकासकामांचाही आढावा घेतला.

संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT