Akola sakal
अकोला

अकोला : खरीप गेला, आता भिस्त रब्बीवर; पेरणीला सुरुवात

शेतकऱ्यांचा हरभरा पिकाकडे कल असून, हरभरा लागवड क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पी. डी. पाटील

रिसोड (जि. अकोला) : मागील महिन्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हातून गेला आहे. त्यामुळे भिस्त आता रब्बीवर आहे. शेतीची मशागत करून तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात सुद्धा झाली आहे. शेतकऱ्यांचा हरभरा पिकाकडे कल असून, हरभरा लागवड क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

ऐन काढणीच्या हंगामात उडीद व मुंगाला अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाठोपाठ परतीच्या पावसाने सोयाबीन नेस्तनाबूत केले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेही हिरवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. आता पावसाने उघडीप दिली आहे.

थंडीची सुद्धा चाहूल लागली असून, रब्बी पेरणीला वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा जास्त प्रमाणात असल्याने तण मोठ्या प्रमाणात वाढले होते. तणनाशक फवारणी करून ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेतीची मशागत करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. काही ठिकाणी पेरणीयोग्य झालेल्या शेतामध्ये हरभरा पेरणीला सुरूवात झाली आहे.

सततच्या पावसामुळे तूर पिकाचे नुकसान झाल्यामुळे पीक मोडून हरभरा पिकासाठी शेतीची मशागत केली जात आहे. त्यामुळे यावर्षी हरभऱ्याच्या क्षेत्रांमध्ये वाढ होणार आहे. यावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. वीज वितरण कंपनीने प्रलंबित वीज जोडण्या पूर्ण करून नियमित वीज पुरवठा केल्यास रब्बी पिकाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. खरीप हातचे गेल्यानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला असून, आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बीवर आहे.

मागील काही वर्षापासून खरिपाची पिके निसर्गाच्या कचाट्यात सापडतात तर, रब्बी पिके वीज वितरण कंपनीच्या सुलतानशाहीमुळे वाळून जातात. यावर्षी विहिरीमध्ये तसेच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा.

- घनश्याम मापारी, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT