Uddhav Thackeray 
अकोला

Uddhav Thackeray: ठाकरे गटात पुन्हा मोठा बंड होणार? संभाजीनगरमध्ये पार पडली गुप्त बैठक

Sandip Kapde

Akola News : फुटीनंतर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा दोन गटात शिवसेना विखरुली गेली आहे. त्यात आता ठाकरे गटातील नाराज शिवसैनिक बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असून, माजी जिल्हाप्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची भेट घेतली.

छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये झालेल्या बैठकीला माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव परनाटे, माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक, ठाकरे गटाचे शहर संघटक संतोष अनासाने, माजी उपजिल्हाप्रमुख तथा एसटी कामगार सेना प्रादेशिक सचिव अमरावती प्रदेश देविदास बोदडे, उपशहर प्रमख पपू चौधरी, राजेश मिसे, गौरव अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थित होती. शिवसेनेचे युवा नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक रामेश्वर पवळ, प्रवक्ते नरेश म्हस्के, प्रदेश उपसचिव भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

आमदार देशमुखांना मोठा धक्का

बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत व येथून गुवाहटीला गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदही आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेतील निष्ठावतांचा एक मोठा गट नाराज असल्याने शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याने आमदार देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

बैठकीनंतर निर्णय

अकोल्यातील ठाकरे गटाचे नाराज नेते लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आमदार म्हणतात कुणीही जाणार नाही!

शिवसेना ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. असे असले तरी जिल्हा प्रमुखाची जबाबदारी असलेले आमदार नितीन देशमुख यांनी कुणीही नाराज नसून, कुणीही कुठेही जाणार नसल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT