A young man from Chikhali has posted a photo of his wife in a public place for divorce 
अकोला

घटस्फोटासाठी युवकाचे विकृत कृत्य; आक्षेपार्ह मजकूरासह सार्वजनिक ठिकाणी लावले पत्नीचे फोटो

सकाळ वृत्तसेवा

चिखली (बुलडाणा) : संताप आणि विकृती किती खालच्या पातळीवर माणसाला नेऊ शकते. याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यात समोर आले असून तालुक्यातील अंचरवाडी येथील एका विवाहित युवतीचे आक्षेपार्ह फोटो मजकूरासह सार्वजनिक ठिकाणी अगदी मूत्रीघरातसुद्धा लावल्याची दिसून आले आहे. पत्नीने घटस्फोट द्यावा याकरिता त्याने हे कृत्य केले असून, पत्नीच्या बहिणीचे आणि आईचेसुद्धा फोटो लावून बदनामी करेन, अशी धमकीसुद्धा त्याने सासरच्या मंडळीला दिल्याचा आरोप सदर युवकांवर होत आहे.

कोविड लॅबने गाठला एक लाखाचा पल्ला; दररोज तपासणी करिता येत आहे तीन ते चार हजार नमुने
 
देऊळगावराजा तालुक्यातील निमगाव येथील समाधान रामदास निकाळजे असे या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात विवाहितेच्या भावाने अंढेरा पोलिसांत तक्रार दिली असून अंढेरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. समाधान याचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी मागील वर्षी ३० जूनला झाला होता. मात्र, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तो सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे सदर विवाहित ही दिवाळी पासून माहेरीच राहते होती. दरम्यान घटस्फोट मिळावा यासाठी समाधान निकाळजे याने स्वतःच्या बायकोचे फोटो, पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले व त्यावर गरज पडल्यास संपर्क साधावा असे म्हणून काही मोबाईल नंबर नमूद करीत लावले होते.

याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला असता जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस, रेल्वे स्टेशन, सगळ्या ठिकाणी फोटो लावून बदनामी करण्याची धमकी दिली आहे. बायकोच्या बहिणीचे व आईचेही असेच फोटो लावून बदनामी करीन अशा धमक्या दिल्या आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT