Youth suicide Suicide Youth suicide Suicide
अकोला

बुलडाणा : लग्न जुळत नसल्याने युवकाने स्वतःचे सरण रचून केली आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा : लग्न जुळत नसल्याने निराश झालेल्या युवकाने स्वतःचे सरण रचून आत्महत्या (Youth suicide) केली. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे गुरुवारी (ता. १७) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. महेंद्र बेलसरे (२८, रा. पळशी खुर्द) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यात येणाऱ्या पळशी खुर्द येथील महेंद्र बेलसरे या युवकाचे लग्न जुळत नव्हते. यामुळे तो नैराश्यात राहत होता. बुधवारी (ता. १६) रात्री महेंद्रने स्वतःच्या शेतात सरण रचून जाळून घेत आत्महत्या (Youth suicide) केली. ही घटना गुरुवारी सकाळी अघडकीस आली. महेंद्र हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

महेंद्रच्या वडिलांच्या नावाने तीन एकर बागायती शेती आहे. तसेच गावातील इतर लोकांची आठ ते दहा एकर शेती ते ठेक्याने घेऊन करतात. बुधवारी गावात दोन लग्नसमारंभ असल्याने सर्वांचे लक्ष लग्न सोहळ्याकडे होते. यातच महेंद्रने स्वतःच्या शेतात पडलेल्या काड्यांचे सरण रचले आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी घेतली. यात त्याचा जळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली होती.

मागील काही दिवसांपासून महेंद्र हा स्वतःचे लग्न जुळत नसल्याने नैराश्यात गेला होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, याच नैराश्यातून त्याने आपली जीवन यात्रा संपविल्याचे सांगण्यात (Youth suicide) येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनेचा पुढील तपास खामगाव (Khamgaon) ग्रामीण पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT