Bank 
अर्थविश्व

६ बँका झाल्या इतिहासजमा; जाणून घ्या सविस्तर माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील ६ सरकारी बँका आजपासून बंद झाल्या आहेत. या बँकांचे दुसऱ्या सरकारी बँकांमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या बँकांमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी सविस्तर वाचा. एका झटक्यात ६ सरकारी बँका इतिहासजमा होण्याची ही घटना ऐतिहासिक घटना म्हणून यापुढे ओळखली जाईल. या बँकांमध्ये ओरिएंटरल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक आणि सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे. जर या बँकांचे तुम्ही ग्राहक असाल, तर आजपासून तुम्ही नव्या बँकांचे खातेदार झाला आहात. 

कोणत्या बँकेत झालं बँकांचं विलिनीकरण
ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँकांचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण झाले आहे. या दोन्ही बँकांचे खातेदार पीएनबीचे खातेदार झाले आहेत. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी नव्या बँकेचं पासबुक, चेकबुक बँकेतून घ्यावे. याबरोबर आयएफएससी (IFSC) कोडही बदलणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. 

आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन बँकांचे विलिनीकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झाले आहे. या बँकांच्या ग्राहकांनीही नवीन चेकबुक आणि आयएफएससी कोड बँकेतून घ्यावा. 

या बँकांचं विलिनीकरण काही दिवसांत होणार
अलाहाबाद बँक १ मे २०२१नंतर इंडियन बँकेत विलीन होणार आहे. तर कॅनरा बँक १ जुलै २०२१ पासून सिंडिकेट बँकेत विलीन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही बँकेच्या ग्राहकांना नवीन पासबुक, चेकबुक आणि आयएफएससी कोड देण्यात येणार आहेत. 

तसेच ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायडेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँकेचे आयएफएससी कोड हे १ एप्रिलपासून बदलले जाणार आहे. या सर्व बँकांच्या ग्राहकांना यापुढे आता नव्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागणार आहे. तसेच एमआयसीआर कोडही बदलणार आहे. 

ऑगस्ट २०१९मध्येच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. 

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT