Adani Group Hindenburg Research News Sakal
अर्थविश्व

Adani Group : हिंडेनबर्ग रिपोर्टनंतरही अदानी एंटरप्रायझेसच्या नफ्यात मोठी वाढ; अदानी म्हणाले, गुंतवणूकदारांचे...

अदानी एंटरप्रायझेसने तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Adani Group News : हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेसने मंगळवारी, 14 फेब्रुवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसचा निव्वळ नफा 820 कोटी रुपये होता.

गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 11.63 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. व्यवसायातून कंपनीचे उत्पन्न 42 टक्क्यांनी वाढून 26,612.2 कोटी रुपये झाले आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी कंपनीच्या नफ्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

गौतम अदानी यांनी शेअर्सबाबत मोठे वक्तव्य :

अदानी एंटरप्रायझेसचे निकाल समोर आल्यानंतर गौतम अदानी यांनी कंपनीच्या शेअर्सबाबत सांगितले की, ''कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्याची चढ-उतार तात्पुरती आहे'' गौतम अदानी यांच्या वतीने मंगळवारी निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात ते म्हणाले की, ''अदानी एंटरप्रायझेसने गेल्या तीन दशकांत स्वतःला सिद्ध केले आहे. कंपनीने स्वतःला एक यशस्वी इन्फ्रास्ट्रक्चर इनक्यूबेटर म्हणून सिद्ध केले आहे. कंपनीने आपल्या उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्डसह हे स्थान प्राप्त केले आहे.''

कंपनीने निकालावर एक निवेदन जारी केले, गौतम अदानी म्हणाले की, ''आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे. अदानी एंटरप्रायझेसमध्ये प्रचंड नफा कमावण्याची क्षमता आहे. आम्ही अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांचे पैसे वाढवले ​​आहेत.''

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

विशेष म्हणजे, तिमाही निकाल आल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर्स 1,611.30 रुपयांवरून 1,889 रुपयांवर गेले.

निकाल जाहीर झाल्यानंतर, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बीएसईवर 1.91 टक्क्यांनी वाढून 1,750.30 रुपयांवर बंद झाले. बुधवारीही बाजार उघडल्याने अदानीच्या शेअर्सने वेग पकडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT