Adani Group News Sakal
अर्थविश्व

Adani Row: : अदानींना आणखी एक मोठा धक्का! डाऊ जोन्सनेही अदानींच्या शेअर्सला दाखवला बाहेरचा रस्ता

अदानी समूहाला अमेरिकन बाजारातूनही मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adani Group News : अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि अंबुजा सिमेंट या तीन समभागांचा ASM (अतिरिक्त मॉनिटरिंग मेजर) यादीत समावेश झाल्यानंतर या समूहाला अमेरिकन बाजारातूनही मोठा धक्का बसला आहे.

आता डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सने (Dow Jones Sustainability Index) त्यांच्या निर्देशांकातून शेअर्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

यूएस मार्केटच्या निर्देशांकाच्या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की, 7 फेब्रुवारी 2023 पासून कंपनीचे शेअर्स डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकले जातील.

निर्देशांकाच्या वतीने घोषणा करताना अदानी समूहाच्या समभागात गडबड झाल्याच्या वृत्तानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे शेअर्स 7 फेब्रुवारी 2023 पासून म्हणजेच पुढील मंगळवारपासून निर्देशांकातून वगळले जातील.

हेही वाचा : ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर डाऊ जोन्सने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अदानी समूहाने आपला एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या घडामोडींमुळे अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स रु. 3442 प्रति समभागाने व्यवहार करत होते ते प्रति समभाग रु.1565 वर आले आहेत. कंपनीचे शेअर्स 55 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग यांच्या अहवालानंतर अदानी समूहाचे अनेक शेअर्स 60 टक्क्यांच्या खाली आले आहेत.

यामुळे ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावरून 21 व्या क्रमांकावर आहे.

या वर्षी, अदानी यांची मालमत्ता 59.2 अब्ज डॉलरने कमी होऊन 61.3 अब्ज डॉलर झाली आहे. अदानीला अवघ्या एका आठवड्यात सुमारे 52 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT