Alstone Textile Share sakal
अर्थविश्व

Textile Share: 'हा' टेक्सटाइल शेअर ठरला मल्टीबॅगर, दहा आठवड्यात दहा पट वाढ

गेल्या 20 दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सतत 5 टक्क्यांचे अपर सर्किट दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

टेक्सटाइल सेक्टरमधील अल्स्टोन टेक्सटाइल्स  (Alstone Textiles) या कंपनीने गेल्या अडीच महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या 20 दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सतत 5 टक्क्यांचे अपर सर्किट दिसत आहे.

त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 1 महिन्यात 151 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी अल्स्टोन टेक्सटाइल्सचा स्टॉक लिस्ट झाला होता. त्यावेळी त्याच्या शेअर्सची किंमत फक्त 15.75 रुपये होती. तेव्हापासून, त्यांनी गेल्या 10 आठवड्यांत गुंतवणुकदारांना 10 पट जास्त परतावा दिला आहे. (Alstone Textile Share became multibagger stock in share marekt)
 

स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सच्या बातम्यांमुळे अल्स्टोन टेक्सटाइल्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सना मान्यता देण्याबाबत विचार करण्यासाठी त्यांचे संचालक मंडळ 10 नोव्हेंबरला बैठक घेणार असल्याचे कंपनीने गेल्या महिन्यात स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या सुचनेत म्हटले होते.

या बैठकीत तीन मुद्द्यांवर विचार केला जाणार आहे. 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सचे 1 रुपया फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्समध्ये विभाजन करणे, शिवाय कंपनीचे अधिकृत शेअर भांडवल वाढवणे आणि तिसरे म्हणजे बोनस शेअर्स घोषित करणे.

1 लाखाचे 10 लाख
अल्स्टोन टेक्सटाईलचे शेअर्स मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 167.55 रुपयांवर होते. 26 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा त्याचे शेअर्स पहिल्यांदा बीएसईवर लिस्ट झाले तेव्हा त्याची किंमत फक्त 15.75 रुपये होती.

अशाप्रकारे गेल्या अडीच महिन्यांत हा शेअर सुमारे 963 टक्क्यांनी वाढला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 26 ऑगस्ट 2022 रोजी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 10.63 लाख झाले असते.

कंपनी काय करते ?
अल्स्टोन टेक्सटाईल ही कंपनी कापूस, लोकर, आर्ट सिल्क, नैसर्गिक रेशीम, तयार कपडे, होजियरी, सिंथेटिक फायबर आणि फॅब्रिक्स शिवाय मिक्स्ड फॅब्रिकसारख्या टेक्सटाइलचा बिझनेस करते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT