amazon
amazon amazon
अर्थविश्व

Amazon च्या 'प्रोजेक्ट कुइपर'साठी फेसबुकमधील तज्ज्ञांची टीम

प्रमोद सरवळे

लॉस एंजेलिस: Amazon ने कंपनीच्या कुइपर प्रोजेक्टसाठी (Project Kuiper) फेसबुकमधील डझनभर उपग्रह तज्ञांची टीम घेतली आहे. यामध्ये वायरलेस इंटरनेटमध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांना नियुक्त केले आहे. या तज्ज्ञांची मदत Amazon ला कंपनीचे उपग्रह पाठवण्यासाठी आणि अमेरिकेत व परदेशात ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी भासणार आहे. ही तज्ज्ञांची टीम अॅमेझॉन कंपनीचे कमी कक्षेतील उपग्रहांचे जाळे (low-orbit satellites) तयार करण्यावर लक्ष देणार आहे.

Project Kuiper

ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा पोचवण्याचे लक्ष्य-

हे सर्व कर्मचारी अमेरिकेतील लॉस एंजेलिस भागात काम करणारे आहेत. त्यामध्ये भौतिकशास्त्रज्ञ, ऑप्टिकल अभियंता, सॉफ्टवेअर अभियंते, प्रोटोटाइप अभियंता आणि यांत्रिक अभियंता यांचा समावेश आहे. ज्यांनी यापूर्वी फेसबूकमध्ये एरोनॉटिकल सिस्टम आणि वायरलेस नेटवर्क्सवर काम केले आहे. सध्या फेसबूक उपग्रहाद्वारे दुर्गम भागात ब्रॉडबँड पोहोचवण्यासाठी (broadband via satellite to remote areas) स्वतःची उपकरणे वापरत आहे.

2029 पर्यंत चालणार प्रोजेक्ट कुइपर-

अॅमेझॉनला 2020 मध्ये फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने (Federal Communications Commission) 3 हजार 236 लो अर्थ ऑरबीट सेटेलाईट नेटवर्क चालविण्यास मान्यता दिली होती. या उपग्रहांमुले ब्रॉडबँड सेवा देण्यास मदत होणार आहे. Amazon ने या प्रकल्पासाठी 10 अब्ज रुपये गुंतवले आहेत. 2026 च्या जुलैपर्यंत यातील अर्धे उपग्रह प्रक्षेपित केले जातील व राहिलेले उपग्रह 2029 पर्यंत पाठवले जातील.

amazon project kuiper

इतर कंपन्यांचेही प्रयत्न सुरू-

सध्या कुइपर प्रकल्पात पाचशे कर्मचारी काम करत असून अॅमेझॉन अजून कामगरांना घेत आहे. फेसबुकच्या दक्षिणी कॅलिफोर्निया-आधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे माजी प्रमुख जिन बिनस (Jin Bains) आता अ‍ॅमेझॉनच्या प्रोजेक्ट कुइपर येथे संचालक असणार आहेत. अ‍ॅमेझॉन व्यतिरिक्त स्पेसएक्स (SpaceX) आणि भारती एअरटेलचे वनवेब (Bharti Airtel-backed OneWeb) सारख्या कंपन्या जगातील दुर्गम आणि ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT