Job Cuts  sakal
अर्थविश्व

Job Cuts : मंदीचे सावट! भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने दिला 20,000 कर्मचाऱ्यांना नारळ

इतिहासातील ही चौथी मोठी कर्मचारी कपात असेल.

सकाळ डिजिटल टीम

Amazon Layoffs : जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरूच आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स जगतातील दिग्गज कंपनीने आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर नोकर कपात सुरू केली आहे. Amazon ने अगोदर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान विभागातील सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची बातमी होती.आता पुन्हा एकदा Amazon वरून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची बातमी आली आहे.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

अॅमेझॉन आपल्या विविध विभागांमधून सुमारे 20,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते. ग्रेड 1 ते ग्रेड 7 पर्यंतच्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसणार आहे. कॉम्प्युटरवर्ल्डने आपल्या रिपोर्टमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले होते की, Amazon 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.

Amazon चे जगभरात 1.5 दशलक्ष कर्मचारी आहेत. जर 20,000 लोकांची कपात केली तर ती एकूण कर्मचार्‍यांच्या 1.3 टक्के असेल. ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल त्यांना 24 तासांची नोटीस आणि वेतन दिले जाईल. अॅमेझॉनच्या इतिहासातील ही चौथी मोठी कर्मचारी कपात असेल.

कोरोनानंतर कंपनीचा महसूल सातत्याने कमी होत होता, त्यामुळे कपातीची गरज निर्माण झाली आहे. 17 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना मेसेजमध्ये सांगितले की, कंपनी कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. या कपातीमुळे किती लोकांना याचा फटका बसेल हे त्यांनी सांगितले नाही. अँडी जस्सी म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील आव्हानात्मक परिस्थिती कायम आहे, त्यामुळे हे वर्ष कठीण राहिले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षात आम्ही जबरदस्त नोकरभरती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT