IPO Sakal
अर्थविश्व

2022 मध्ये पैसा कमावण्याची बंपर संधी! येणार 60 हजार कोटींचा IPO

2022 मध्ये पैसा कमावण्याची बंपर संधी! येणार 60 हजार कोटींचा IPO; पाहा IPO ची यादी

सकाळ वृत्तसेवा

वर्ष 2022 मध्ये IPO बाजारात विक्रमी बजर वाजणार आहे.

तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरपासून (Initial Public Offer - IPO) कमाई करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वर्ष 2022 मध्ये IPO बाजारात विक्रमी बजर वाजणार आहे. एकापेक्षा जास्त कंपन्या बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. पुढील वर्षी 1 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त किमतीचा IPO पाइपलाइनमध्ये आहे. प्रायमरी मार्केट ट्रॅकर प्राइम डेटाबेसच्या (Primary Market Tracker Prime Database) माहितीनुसार, 2021 मध्ये 63 भारतीय (India) कंपन्यांनी मेनबोर्ड IPO द्वारे विक्रमी 1.19 ट्रिलियन रुपये उभे केले. हे 2020 मध्ये 15 IPO द्वारे उभारलेल्या 26,613 कोटी रुपयांच्या 4.5 पट आहे आणि 2017 मधील मागील सर्वोत्तम 68,827 कोटी रुपयांच्या जवळपास दुप्पट आहे. (An IPO worth Rs sixty thousand crore will come in the new year)

कंपन्या उभारणार 50 हजार कोटी

प्राइम डेटाबेसनुसार, सुमारे 35 कंपन्यांनी पुढील वर्षी त्यांच्या IPO साठी SEBI ची मंजुरी मिळवली आहे, ज्यांचा सुमारे 50 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव आहे. आणखी 33 कंपन्या नियामक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सुमारे 60 हजार कोटी उभारण्याची योजना आहे. यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India - LIC) च्या बहुप्रतीक्षित IPO चा समावेश नाही, जे या आर्थिक वर्षात लॉंच होण्याची अपेक्षा आहे.

हे आयपीओ आहेत रांगेत

अहवालानुसार, अशा किमान अर्धा डझन कंपन्या आहेत ज्या डिसेंबरच्या अखेरीस सेबीकडे त्यांचे मसुदे दाखल करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये चाइल्डकेअर हॉस्पिटल चेन रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटल्स (Childcare Hospital Chain Rainbow Children's Hospitals), एनालिटिक्‍स फर्म कोर्स 5 इंटेलिजेन्स (Analytics Firm Course 5 Intelligence), एअरपोर्ट लाउंज ऑपरेटर ड्रीमफोक्‍स (Airport Lounge Operator DreamFolks), TBO Travel, CJ DARCL Logistics आणि Campus Shoes यांचा समावेश आहे.

डिसेंबरमध्ये, फॉक्‍सकॉनची भारतीय शाखा भारत FIH लिमिटेड आणि स्नॅपडील लिमिटेडसह (Snapdeal Limited) सुमारे आठ कंपन्यांनी SEBI कडे ड्राफ्ट प्रॉस्पेक्‍टस दाखल केला. यासोबतच अदानी विल्मर लिमिटेड (Adani Wilmer Ltd.), गो एअरलाइन्स (Go Airlines), फार्मसी आणि देहलीवरीचे आयपीओही पाइपलाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT