Anil Ambani sakal
अर्थविश्व

Anil Ambani : अनिल अंबानींना आणखी एक धक्का; 'या' कंपनीचीही होणार विक्री

रिलायन्स कॅपिटलच्या लिलावानंतर आता अनिल अंबानींची आणखी एक कंपनी विक्रीसाठी निघाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स कॅपिटलच्या लिलावानंतर आता अनिल अंबानींची आणखी एक कंपनी विक्रीसाठी निघाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या अहमदाबाद विशेष खंडपीठाने त्याला मंजुरी दिली आहे. अनिल अंबानींची नेवल डिफेंस अँड इंजीनियरिंग  (Reliance Naval Defence & Engineering) कंपनीवर बँकांचे मोठे कर्ज आहे.

स्वान एनर्जीच्या नेतृत्वाखालील हेझेल मर्कंटाइलच्या कन्सोर्टियम योजनेला आज मंजुरी देण्यात आली आहे. हेझेल कंपनीने 2,700 कोटी रुपयांची बोली लावली आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, एनसीएलटीने रिलायन्स नेव्हलसाठी हेझेल मर्कंटाइलच्या योजनेला मान्यता दिली आहे. यासोबतच जिंदाल स्टील अँड पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दाखल केलेली याचिका एनसीएलटीने फेटाळली आहे.

अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या विक्रीला मंजुरी मिळाल्यानंतर शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढले. या कंपनीचे शेअर्स या वर्षी अनेक महिने ट्रेडिंगसाठी बंद होते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

अनिल अंबानी यांच्या कंपनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियासह एकूण 12,429 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. अशा स्थितीत बँक आणि वित्तीय कर्जदारांनी 26 महिन्यांपूर्वी वसुलीसाठी ही प्रक्रिया सुरू केली.

हेज मर्कंटाईलने या कर्जबाजारी कंपनीसाठी सर्वाधिक 2,700 कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यानंतर या प्रदीर्घ प्रक्रियेत हेझल मर्कंटाईलला एनसीएलटीची मान्यता मिळाली आहे. अलीकडेच NCLT ने Reliance Infratel द्वारे Reliance Jio च्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT