anil ambani
anil ambani 
अर्थविश्व

कर्जबाजारी अनिल अंबानी करणार रिलायन्स इन्फ्राची विक्री 

वृत्तसंस्था

मुंबई  - अनिल अंबानी यांच्या समोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अंबानी दिवाळखोर झाले असून बँकांची कर्ज फेडण्यासाठी कंपन्यांमधील हिस्सा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. 

अंबानींना लंडनमधील न्यायालयाने चिनी बँकांची देणी लवकर फेडण्याचे आदेश दिले आहेत.  कर्जफेड न केल्यास तुरुंगात देखील जावे लागेल असा इशारा न्यायालयाने अनिल अंबानींना दिला आहे. परिणामी आता अंबानींनी पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

अंबानी दिल्लीतील वीज पुरवठा करणारी रिलायन्स इन्फ्रामधील हिस्सा विक्री करणार आहे. रिलायन्स इन्फ्रासाठी आतापर्यंत तीन कंपन्यांनी बोली लावली आहे. 

* अंबानी रिलायन्स इन्फ्रामधील हिस्सा विक्री करणार 
* रिलायन्स इन्फ्रासाठी आतापर्यंत तीन कंपन्यांची बोली
* अंबानींना लंडनमधील न्यायालयाचे चिनी बँकांची देणी लवकर फेडण्याचे आदेश
*  रिलायन्स समूहाचे बाजार मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज
* दिल्लीतील वीज पुरवठा करते रिलायन्स इन्फ्रा

रिलायन्स इन्फ्राच्या दिल्लीतील व्यवसासाठी इटलीतील एनेल समूहाने उत्सुकता दर्शविली आहे. शिवाय ग्रीनको आणि टोरंट पॉवर या दोन कंपन्यांनी देखील लिलावात सहभाग घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही कंपन्यांनी शुक्रवारी निविदा सादर केल्या आहेत. रिलायन्स समूहाचे बाजार मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

कंपनीने लिलावासाठी केपीएमजी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्स इन्फ्राची बीएसईएस राजधानी पॉवर आणि बीएसईएस यमुना पॉवर या दोन कंपन्यांमध्ये 51 टक्के हिस्सेदारी आहे. तर उर्वरित 49 टक्के हिस्सा दिल्ली सरकारचा आहे.  रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर या दोन कंपन्यांकडून दिल्लीतील सुमारे 93 टक्के ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. 

दोन वर्षांपूर्वी अंबानी यांनी मुंबईतील वीज वितरण व्यवसाय अदानी ट्रान्समिशन  कंपनीला 18 हजार 800 कोटी रुपयांना विकला होता.   आता मात्र दिल्लीतील लिलावात अदानी समूहाने सहभाग घेतलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT