Anil Ambani
Anil Ambani  sakal media
अर्थविश्व

Anil Ambani | अनिल अंबानींना मोठा झटका, दिवाळखोरीतील कंपनीला वाचवण्यात अपयश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांना मोठा झटका बसला आहे. निखिल मर्चंटची हेजल मर्केंटाईल-स्वान एनर्जी कन्सोर्टियमने अनिल अंबानींची दिवाळखोरीत निघालेल्या शिपयार्ड कंपनी रिलायन्स नवल अँड इंजिनिअरिंगसाठी बोली जिंकली आहे. याबरोबरच कंपनी वाचवण्याचे अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे.

दोन हजार ७०० कोटी रुपयांची बोली

'बिझनेस टुडे' च्या वृत्तानुसार जवळपास ९५ टक्के कर्जदारांनी निखिल मर्चंट यांच्या कंपनीच्या बाजूने मतदान केले आहे. आता रिलायन्स नवलचे रिझाॅल्यूशन प्रोफेशनल लवकरच विजयी बोलीच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण (National Company Law Tribunal) अहमदाबादशी संपर्क साधणार आहे. हेजल मर्केंटाईल लिमिटेड आणि स्वान एनर्जी लिमिटेडच्या एका कंपनीने रिलायन्स नवलसाठी (Reliance Naval) जवळपास २ हजार ७०० कोटी रुपयांची बोली लावली आहे.

रिलायन्स नवलला वाचवण्यासाठी अनिल अंबानी सतत प्रयत्न करित होते. दुसरीकडे निखिल मर्चंट यांची कंपनी हेजल मर्केंटाईलला रिलायन्स नवलची बोलीत भाग घेण्याच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करत टारपीडोकडे मोर्चा वळवला होता. हेझल मर्केंटाइल कन्सोर्टियमला बोलीसाठी अपात्र घोषित करण्यासाठी रिलायन्स इन्फ्राची याचिकेवर गेल्या सोमवारी एनसीएलटीची अहमदाबाद पीठाने सुनावणी घेतली. आता न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी ३० मार्च रोजी घेणार आहे.

रिलायन्स नवलचे शेअर भाव

गेल्या गुरुवारी रिलायन्स नवलचे शेअर भाव ४.२४ रुपये होते. जी एका दिवसापूर्वी १.४४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षाच्या जून महिन्यात रिलायन्स नवलचे शेअर भाव ७.१५ रुपयाच्या पातळीवर होते. जे ५२ आठवड्यात सर्वात वरच्या स्तरावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT