अर्थविश्व

ॲस्ट्रल शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल!

- तब्बल 86.4 पटीचा तुफान परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

शरयू काकडे

- शिल्पा गुजर


मल्टीबॅगर स्टॉक: मागच्या 8 महिन्यांत एकूण 42 शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर अर्थात रग्गड परतावा दिला. या काळात, असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी 100% पेक्षा कमी परतावा दिला आणि मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत स्थान मिळवले नाही, पण त्यांनी दीर्घ कालावधीत अनेक गुंतवणुकदारांना कईक पटींनी परतावा देऊन श्रीमंत केले आहे. असाच एक ॲस्ट्रलचा (Astral) स्टॉक आहे.

स्ट्रल शेअरचा इतिहास
गेल्या 10 वर्षांमध्ये, अॅस्ट्रलच्या शेअर्सची किंमत 23.82 रुपयांवरून 2063 रुपये (सोमवारच्या ट्रेडिंग दिवसादरम्यान) वाढली आहे. या कालावधीत या स्टॉकने सुमारे 8,560 टक्के इतका तुफान परतावा दिला आहे. अॅस्ट्रलच्या शेअर्सने फक्त गेल्या एका महिन्यात 4% परतावा दिला आहे आणि या काळात त्याचे शेअर्स 1982.05 रुपयांवरून 2063 रुपये झाले आहेत.

या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार, अॅस्ट्रल शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 30% वाढले आहेत आणि त्याचे शेअर्स 1591.65 रुपयांवरून 2085.30 रुपये झाले आहेत. तर गेल्या एक वर्षात 850.95 रुपयांवर तब्बल 140% वाढून 2063 रुपये झाले आहेत. 5 वर्षांपूर्वी अॅस्ट्रल शेअर्सची किंमत फक्त 263.73 रुपये होती आणि तेव्हापासून त्यांनी 680 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 10 वर्षांत हा स्टॉक 23.82 रुपयांच्या किंमतीवरुन 86.4 पट वाढून 2063 रुपये झाला आहे.

गुंतवणुकीवर परिणाम
अॅस्ट्रल शेअर्सची किंमत पाहता, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत आता 86.04 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी अॅस्ट्रल शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये वाढून 7.80 लाख रुपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी यात0 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे आता 2.40 लाख झाले असते. 6 महिन्यांपूर्वी जर एखाद्याने या शेअर्समध्ये पैसे गुंतवले असते तर ते आता 1.30 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी, 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आज 1.04 लाख रुपये झाले असते.

ॲस्ट्रलचा स्टॉक चार्टवर सकारात्मक दिसत आहे आणि तो अल्पावधीत 2250 ते 2300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हा स्टॉक 1950 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी केला जाऊ शकतो असे मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT