bank holiday
bank holiday esakal
अर्थविश्व

Bank Holidays: उद्यापासून सलग ५ दिवस बँका बंद!

सकाळ डिजिटल टीम

मार्च महिन्याच्या अखेरिस या आर्थिक वर्षाचा शेवट होणार आहे. नवं आर्थिक वर्ष येत्या एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. मात्र, पहिल्याच महिन्यामध्ये बँका 9 दिवस बंद असणार आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, वीकेंड वगळून एप्रिलमध्ये बँका नऊ दिवस बंद राहणार आहेत. बँका बंद असणार्‍या दिवसांच्या यादीत दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारचाही समावेश आहे. १ एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभाचाहा दिवस असेल आणि त्याच दिवशी महिन्याची पहिली सुट्टी देखील असेल.

केंद्रीय बँका सुट्ट्यांचे वर्गीकरण 'राष्ट्रीय' आणि 'प्रादेशिक' अशा दोन भागात करतात.

पहिल्या श्रेणीमध्ये भारतभरातील बँकांना सुट्ट्या येतात, तर प्रादेशिक श्रेणीमुळे काही राज्यांमधील बँकांच्या शाखा बंद होतात.

एप्रिल 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे

  • 1 एप्रिल: early closing of accountsमुळे बँका बंद राहतील. आयझॉल, चंदीगड, शिलाँग आणि शिमला वगळता देशातील जवळपास सर्व भागांमध्ये बँका बंद राहतील.

  • 2 एप्रिल: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढी पाडवा/ उगादी सण/ नवरात्र/ तेलुगु नववर्ष दिन/ साजिबू नोंगमापनबा (चेराओबा) मुळे बँका बंद राहतील.

  • 4 एप्रिल : सरहूलच्या निमित्ताने रांचीमध्ये बँका बंद राहणार आहेत.

  • 5 एप्रिल : बाबू जगजीवन राम यांच्या वाढदिवसानिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहणार आहेत.

  • 14 एप्रिल: बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ वैसाखी/ तमिळ नववर्ष दिन/ चेराओबा/ बिजू उत्सव/ बोहाग, बिहू यांमुळे शिलाँग आणि शिमला वगळता देशातील जवळपास सर्व भागात बँका बंद राहतील.

  • 15 एप्रिल: गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष दिन (नबावर्षा)/ हिमाचल डे/ विशू/ बोहाग बिहूच्या निमित्ताने देशातील जवळपास सर्व भागात बँका बंद राहतील.

  • 16 एप्रिल : गुवाहाटीमध्ये बोहाग बिहूच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहणार आहेत

  • 21 एप्रिल : आगरतळामध्ये गरिया पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.

  • 19 एप्रिल: शब-ए-कदर/जुमत-उल-विदामुळे जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT