Mutual Fund Investment
Mutual Fund Investment Sakal
अर्थविश्व

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

शिल्पा गुजर

कोरोना काळात शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडबद्दल लोकांची समज वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून, अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. एफडी (Fixed Deposites) मधील कमी परताव्यामुळे, बहुतेक लोक आता स्टॉक मार्केटकडे वळत आहेत.म्युच्युअल फंड किंवा इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये थोडी रिस्क घेऊन त्यांचे पैसे गुंतवत आहेत.

म्युच्युअल फंडकडे वाढता कल

म्युच्युअल फंडांची रचना अतिशय सोपी आहे. म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून गुंतवणूकदारांचे पैसे थेट कोणत्याही एका इक्विटीमध्ये गुंतवले जात नाहीत, त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता कमी असते. देशातील म्युच्युअल फंडात गेल्या 10 वर्षांत मोठी वाढ दिसून आली आहे. सध्या, 2500 हून अधिक म्युच्युअल फंड योजना आहेत, जिथे कोणीही गुंतवणूक करू शकतो. तुम्हालाही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे असतील तर तज्ज्ञांचे मत आवश्यक आहे. इन्व्हेस्टिकाचे रिसर्च मॅनेजर (Investica) अक्षत गर्ग यांनी 5 गोष्टी लक्षात घेण्याचा सल्ला दिला आहे, कोणत्या त्या पाहुयात.

1) गुंतवणूकीची कालमर्यादा (Time Limit For Investment)- इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची उद्दिष्टे आणि कालमर्यादा निश्चित असली पाहिजे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला 3 वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर मिडकॅप आणि स्मॉलकॅपपासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्हाला 4 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मिडकॅप्समध्ये गुंतवणूक करू शकता. कारण लार्जकॅपपेक्षा मिडकॅप जास्त परतावा देते.

2) लाँग टर्म कामगिरी (Long Term Performance)- म्युच्युअल फंडाच्या बेंचमार्कच्या तुलनेत त्या फंडाच्या कामगिरीचा मागोवा घेणे कठीण असते. जर म्युच्युअल फंड योजना 3, 5 किंवा 7 वर्षांत त्याच्या बेंचमार्कला मागे टाकत नसेल, तर अशा स्कीमपासून दूर राहिले पाहिजे.

3) एक्सपेंश रेश्यो (Expense Ratio)- गुंतवणूकदारांनी अशा म्युच्युअल फंड योजनांपासून दूर राहावे, ज्यांचे खर्चाचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आदर्श एक्सपेंश रेश्यो 1.8-2 टक्के इतके असू शकते. एक्सपेंश रेश्यो म्हणजे म्युच्युअल फंड योजना चालवण्यासाठी एएमसी किती खर्च करते. एक्सपेंश रेश्योचा भार गुंतवणूकदारावर पडतो.

4) शार्प रेश्यो (Sharp Ratio)- शार्प रेशोचा वापर म्युच्युअल फंडाच्या रिस्क परफॉर्मंसचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. एखाद्या योजनेत पैसे गुंतवून किती परतावा मिळू शकतो आणि जोखीम किती आहे हे हे प्रमाण दाखवते. जास्त शार्प रेशो असलेला फंड निवडणे हा योग्य ठरु शकतो.

5) फंड मॅनेजरचा अनुभव (Fund Manager Experience)- फंड मॅनेजर गुंतवणूकदार म्हणून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतो आणि पैशाचे व्यवस्थापन करतो. गुंतवणूकदारांनी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करावी, जिथे फंड मॅनेजरचा अनुभव 5-7 वर्षांचा असेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT