Bengaluru Airport IPO esakal
अर्थविश्व

Bengaluru Airport IPO पुढच्या वर्षी येण्याची शक्यता, अधिक जाणून घेऊया

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, फेअरफॅक्स पुढील वर्षी बेंगळुरू विमानतळाचा आयपीओ (IPO) लाँच करण्यावर काम करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bengaluru Airport IPO : बेंगळुरू एअरपोर्ट पुढच्या वर्षीपर्यंत शेअर बाजारात लिस्ट होऊ शकते असा अंदाज आहे. बेंगळुरू विमानतळ (BIAL) सध्या कॅनेडाच्या इनवेस्टमेंट ग्रुप फेअरफॅक्स फायनांशियल होल्डिंग्ज लिमिटेडकडे (Fairfax Financial Holdings Ltd) आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, फेअरफॅक्स पुढील वर्षी बेंगळुरू विमानतळाचा आयपीओ (IPO) लाँच करण्यावर काम करत आहे. ज्याचे मूल्य सुमारे 3.7 अब्ज डॉलर्स आहे. फेअरफॅक्सचे भारतीय युनिट फेअरफॅक्स इंडिया संभाव्य आयपीओसाठी काही सल्लागारांसोबत काम करत असल्याचे सुत्रांकडून समजते आहे.

आयपीओची साईज

हा आयपीओ सुमारे 3,000 कोटी ते 4,000 कोटी रुपयांचा असू शकतो. आयपीओ मधील 75% फ्रेश इक्विटी शेअर्स असू शकतात, तर बाकी 25% विद्यमान शेअर्स असू शकतात.

फेअरफॅक्सने बेंगळुरू विमानतळावर 1 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. भारतातील प्रेम वॉट्सची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यांनी आतापर्यंत भारतात सुमारे 7 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे आणि पुढील 4-5 वर्षांत ही गुंतवणूक दुप्पट करण्याचा त्यांचा मानस आहे.

बंगळुरू विमानतळावर फेअरफॅक्सचा 54 टक्के हिस्सा आहे. सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स जीएमबीएचकडे विमानतळाचा 20 टक्के, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा 13 टक्के आणि कर्नाटक राज्य औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचा उर्वरित 13 टक्के हिस्सा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT