share market
share market google
अर्थविश्व

'हे' 3 शेअर्स तुमच्याकडे आहेत का ?

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी येत्या काळात फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे या अस्थिर वातावरणात दर्जेदार शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करुन घ्या, जेणेकरुन तुम्हाला लाँग टर्मच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. अशात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन मदत करतील. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन तुमच्यासाठी काही उत्तम स्टॉक घेऊन आले आहेत.

जुलै महिना गुंतवणुकदारांना चांगला परतावा देऊ शकतो असा विश्वास संजीव भसीन यांनी व्यक्त केला. मागच्या वेळी त्यांनी बॉश फ्युचर (Bosch Fut), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि आरती इंडस्ट्रीजबाबतची (Aarti Industries) लिस्ट दिली होती, आजही त्यांनी या 3 शेअर्सबाबत विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय एचडीएफसी (HDFC) आणि एचडीएफसी लाईफबाबतीत (HDFC Life) ते सकारात्मक दिसले.

सगळ्यात आधी त्यांनी एसबीआय फ्युचरमध्ये (SBI Fut) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआय ही गोल्ड लोनमध्ये तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे, जी चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतात असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर त्यांनी आयडीएफसी फर्स्ट बँक फ्युचरवर (IDFC First Bank Fut) विश्वास व्यक्त केला आहे. ज्यांचे दर मिडकॅप बँकेत चांगली कामगिरी करत आहेत. त्यांनी सांगितलेला तिसरा शेअर म्हणजे आयशर मोटर्स फ्युचर (Eicher Motors Fut), ज्याने कमर्शियल मोटर्समध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे.

  • एसबीआय फ्युचर (SBI Fut)

  • सीएमपी (CMP) - 468.85 रुपये

  • टारगेट (Target) - 482 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 455 रुपये

  • आयडीएफसी फर्स्ट बँक फ्युचर (IDFC First Bank Fut)

  • सीएमपी (CMP) - 33.35 रुपये

  • टारगेट (Target) - 35 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 32 रुपये

  • आयशर मोटर्स फ्युचर (Eicher Motors Fut)

  • सीएमपी (CMP) - 2778.15 रुपये

  • टारगेट (Target) - 2950 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 2700 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT