Budget 2023 Sakal
अर्थविश्व

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का सादर केले जाते? काय आहे त्याचे महत्त्व; जाणून घ्या

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील.

राहुल शेळके

Economic Survey Budget 2023 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्तऐवज सादर केला जातो, ज्याला आर्थिक सर्वेक्षण म्हणतात. ते आज 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील.

हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्यात मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना, आव्हाने आणि उपाय यांचा उल्लेख आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी अहवाल संसदेत मांडल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील.

आर्थिक सर्वेक्षणात, सरकार आपल्या वित्तीय विकासाविषयी तसेच आर्थिक व्यवस्थापना बद्दल सांगते. सरकारच्या धोरणांचे आणि योजनांचे काय परिणाम झाले आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, याचीही माहिती त्यात असते.

देशाचे पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये सादर करण्यात आले. सन 1964 पर्यंत देशाच्या सामान्य अर्थसंकल्पासोबत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जात होते, परंतु नंतर ते अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर केले जाऊ लागले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करते?

आर्थिक सर्वेक्षण तयारी करण्याची जबाबदारी मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागाकडे असते. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या देखरेखीखाली तयार केला जातो.

आर्थिक सर्वेक्षण का आहे महत्वाचे :

आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा केंद्र सरकारकडून दिला जातो. या दस्तऐवजाच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती कशी आहे? याशिवाय देशाची आर्थिक स्थिती किती वेगाने प्रगती करत आहे? याचीही माहिती दिली जाते.

आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेबाबतच्या सूचनाही सरकारला दिल्या जातात. परंतु, या सूचना स्वीकारणे सरकारला बंधनकारक नाही.

आर्थिक सर्वेक्षण एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम करते. कारण यावरून देशाची अर्थव्यवस्था कशी चालली आहे आणि ती सुधारण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे दिसून येते? अर्थव्यवस्थेचा कल आर्थिक सर्वेक्षणातूनच कळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT