नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज चौथा अर्थसंकल्प सादर केला. नोटाबंदीच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे . जेटलींनी 2017- 18 या आर्थिक वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
केंद्र सरकारने आता तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. याआधी 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) देण्यात आली आहे. म्हणजेच आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही.
5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधी यावर 10 टक्के कर आकारला जात होता. शिवाय 5 लाखांवरील उत्पन्नधारकांना करात 12,500 रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच अंदाजे दोन लाख रुपयांच्या उत्पन्नावर 1 हजार रुपये कर भरावा लागेल.
5 ते 10 लाख उत्पन्न 20 टक्के कर
5 ते 10 लाख लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाणार आहे. यामध्ये चालू अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
10 लाखांवरील उत्पन्न 30 टक्के कर
10 लाखांहून अधिक उत्पन्न मिळविणार्या गटाला 30 टक्के कर द्यावा लागणार आहे. यामध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
उच्च उत्पन्न गटातील लोकांना कर
50 लाख ते 1 कोटी उत्पन्नधारकांना कर द्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना 10 टक्के अधिक सरचार्जही भरावा लागणार आहे. 1 कोटीहून अधिक उत्पन्नधारकांना कराबरोबरच 15 टक्के अधिक सरचार्ज द्यावा लागेल.
अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये :
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.