अर्थविश्व

दीड लाखांवरील थकबाकीवर कर्जमाफी 

सकाळवृत्तसेवा

ठाणे - तत्त्वत: व निकषांच्या घोळामुळे सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेवर विरोधकांकडून रान उठवले जात असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती (टीडीसीसी) बॅंकेने दीड लाखांपेक्षा जास्त कर्जाचा बोजा असणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आशेचा किरण दाखवला आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत दीड लाखांवरील थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा तीन हजार २२५ शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती टीडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. 

ठाणे जिल्ह्यातील २१ हजार ४२५ शेतकऱ्यांची ८० कोटी ९८ लाख आणि पालघर जिल्ह्यातील २१ हजार ३८३ शेतकऱ्यांची ९० कोटी ८० लाखांची कर्जे होती. आतापर्यंत २९ हजार ५५५ शेतकऱ्यांची ९५ कोटी ४१ लाखांची कर्जे माफ झाली असून, अद्याप सरकारकडून बॅंकेला ११५ कोटी येणे आहे. 

दरम्यान, सरकारी निकषानुसार दीड लाखांपर्यंतचीच कर्जे माफ होणार असून, त्यावरील रकमांची कर्जे शेतकऱ्यांनाच फेडावी लागणार असल्याने अद्याप तीन हजार २२५ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT