car bike insurance premium hike in 2022 third party motor insurance premiums may hike 20 percent 
अर्थविश्व

ऑटो इन्शुरन्स महागणार! कोट्यवधी नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार फटका

सकाळ डिजिटल टीम

आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमती त्यात आता देशातील करोडो वाहनधारकांना महागाईचा आणखी एक दणका बसू शकतो. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता (insurance premium hike) वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवला जावा अशी इन्शुरन्स कंपन्यांची इच्छा आहे.

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (Insurance and Regulatory Development Authority of India) पाठवलेल्या प्रस्तावात, कोरोनामुळे कंपन्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता, थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये (third party insurance) 15 ते 20 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. कंपन्यांची मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

IRDAI ला दिला प्रस्ताव

Zeebiz च्या रिपेर्टनुसार भारतात जवळपास 25 जनरल विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDA माण्यात देईल, अशी या कंपन्यांना आशा आहे. कंपन्यांचा असा विश्वास आहे की, त्यांना कोरोनामुळे खूप नुकसान होत असल्याचे या सर्व कंपन्यांचे म्हणणे आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांची सॉल्व्हेंसी (solvency) त्यांच्या प्रिस्क्राब्ड लिमीटच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सचे क्लेमही वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.

थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य

2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर , नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. हा विमा प्रीमियम IRDAI (IRDAI.) द्वारे निर्धारित केला जातो. प्रीमियम दरवर्षी बदलतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT