lpg gas subsidy 
अर्थविश्व

LPG सिलेंडरची सबसिडी जमा झाली ? माहिती करून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला 14.2 किलोच्या 12 सिलिंडरवर सबसिडी देते. जर ग्राहकाला त्यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने विकत घेता येतात. बऱ्याच ग्राहकांना त्यांच्या खात्यात सबसिडीचे किती पैसे जमा होतात याची माहिती नसते.

तसेच सबसिडीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचीही अनेक ग्राहकांची तक्रार आहे. आता ग्राहक सबसिडीची रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकतात. 

अशा प्रकारे एलपीजी सबसिडीची स्थिती कळू शकते:

1. मोबाइलवरून गॅस सिलेंडरच्या सबसिडीबद्दल जाणून घेण्यासाठी आधी Mylpg.in जावे लागेल. या वेबसाइटवर तुम्हाला तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांचे (एचपी, भारत आणि इंडेन) टॅब दिसतील. इथं गेल्यानंतर तुम्ही तुमचं ज्या कंपनीचं असेल त्यावर क्लिक करा.

2. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल, त्यात मेन्यूमध्ये गेल्यानंतर तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी टाका. जर ग्राहकांना त्यांचा एलपीजी आयडी माहीत नसेल तर 'Click here to know your LPG ID' येथे क्लिक करा. 

3. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, LPG कन्झ्युमर आयडी, राज्याचे नाव आणि वितरकाची माहिती टाकली पाहिजे. त्यानंतर कॅप्चा कोड भरल्यानंतर प्रोसेस बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यावर तुम्हाला एलपीजी आयडी दिसेल.

4. आता तुमच्या खात्याचा तपशील एका पॉप-अपवर दिसेल. इथं तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड एलपीजी खात्याशी लिंक केले आहे की नाही या माहितीसह तुम्ही सबसिडीचा पर्याय सोडला आहे की नाही हे देखील समजेल.

5. या पेजच्या डाव्या बाजूला 'सिलेंडर बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी ट्रान्सफर देखे' यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर ग्राहकांना सबसिडीची रक्कम दिसेल.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT