Pancard
Pancard Sakal
अर्थविश्व

तुमचं पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही? असं करा चेक, नाहीतर भरावा लागेल भुर्दंड

सुमित बागुल

पॅनकार्ड (Pancard) आपल्या सर्वांकडे असणारं एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. अगदी आयकर परतावा भरण्यापासून ते बँक अकाउंट उघडण्यापर्यंत कोणत्याही आर्थिक देवाण घेवाणीसाठी पॅन कार्डची गरज भासते. मात्र तुमचं पॅनकार्ड डीऍक्टिव्ह किंवा बंदच झालं तर ? सरकार दोन बाबतीत तुमचं पॅनकार्ड रद्द करू शकतं. यासाठी आधी तुम्ही वारंवार तुमचं पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे सुनिश्चित करायला हवं. जर तुमचं पॅनकार्ड डिऍक्टिव्ह असेल, तर याचा तुम्हाला त्रासही होऊ शकतो. (check your pancard status with three easy steps)

रद्द होईल पॅनकार्ड, दंड देखील भरावा लागेल

30 जून 2020 नंतर ज्यांनी आपलं पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केलेलं नाही त्यांचं पॅनकार्ड रद्द केलं जाईल. ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत त्यांचं कार्ड देखील रद्द केलं जाईल.एकाच व्यक्तीच्या नावावर दोन पॅनकार्ड असणं गुन्हा आहे. इनकम टॅक्स ऍक्ट 1961 च्या सेक्शन 272B नुसार असं करणाऱ्याला 10 हजारांचा दंड भरावा लागू शकतो.

दोन पॅनकार्ड असतील तर सरेंडर करा

जर तुमच्या नावावर दोन पॅनकार्ड असतील तर त्यातील एक पॅनकार्ड लागलीच सरेंडर करा. जर तुम्ही असं केलं नाहीत तर दोन्ही पॅनकार्ड बंद केले जाऊ शकतात. यानंतर तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. तुमचा इनकम टॅक्स भरताना (Income Tax Return) देखील तुम्हाला याचा फटका बसू शकतो.

तुमचं पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही कसं समजेल ?

तुम्ही घरबसल्या तुमचं पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही याची खात्री करू शकतात. यासाठी आयकर विभागाची एक ऑनलाईन प्रोसेस आहे जी अत्यंत सुलभ आहे. तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तीन सोप्या स्टेप्समध्ये तुमचं ऍक्टिव्ह आहे की नाही याची खात्री करू शकतात.

कोणत्या आहेत या तीन सोप्या स्टेप्स :

स्टेप नंबर १ : आयकर विभागाची वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जा तिथे डाव्या हाताला तुम्हाला विविध पर्याय पाहायला मिळतील.

स्टेप नंबर २ : या विविध ऑप्शन्समध्ये तुम्हाला 'नो युअर पॅन' असा ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर एक विंडो उघडेल, त्यात तुम्हाला तुमचं आडनाव, नाव, स्टेटस, जन्मतारीख, लिंग आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल

स्टेप नंबर ३ : सर्व डिटेल्स भरल्यानंतर आणखी एक नवीन विंडो ओपन होईल. ज्यामध्ये तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP तुम्हाला त्याठिकाणी टाकावा लागेल. OTP टाकून झाल्यावर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, नाव, सिटीझन वॉर्ड नंबर आणि रिमार्क पाहायला मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचं पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे समजू शकेल. (check your pancard status with three easy steps)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT