Tata  esakal
अर्थविश्व

गुंतवणूकदारांना धक्का! टाटाची 'ही' कंपनी होणार बाजारातून डी-लिस्ट, शेअर्सची खरेदी-विक्री होणार बंद

टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली

सकाळ डिजिटल टीम

Tata Group : टाटा समूहाच्या दिग्गज टाटा मोटर्सचे शेअर्स न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) मधून डीलिस्ट करण्यात आले आहेत. टाटा मोटर्सने सांगितले की, ते न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून त्यांचे सामान्य शेअर्स स्वेच्छेने डी-लिस्ट करत आहेत.

एका नियामक नोटीसमध्ये माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, भारतीय कायद्यांतर्गत नियामक निर्बंध लादल्यामुळे, सोमवारनंतर अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स (ADS) ची यूएस मार्केटमध्ये खरेदी-विक्री होणार नाही.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

टाटा मोटर्सने सांगितले की, एडीएस धारक त्यांचे शेअर्स न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये डिपॉझिटरीमध्ये जमा करू शकतात.

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

हे काम 24 जुलै 2023 पर्यंत करावे लागणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, या निर्णयाचा भारतातील बीएसई आणि एनएसई वरील इक्विटी समभागांच्या ट्रेडिंग किंवा सध्याच्या स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही.

टाटा मोटर्स लिमिटेड ही रु. 1,40,208.27 कोटी मार्केट कॅपसह ऑटो क्षेत्रात कार्यरत असलेली लार्ज कॅप कंपनी आहे. टाटा मोटर्सने सोमवारी जाहीर केले की, ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे.

भागीदारी अंतर्गत, बँक अधिकृत प्रवासी ईव्ही डीलर्सना इन्व्हेंटरी फंडिंग व्यतिरिक्त डिझेल आणि पेट्रोल मॉडेल्सच्या डीलर्सना बँक फंडिंग करणार आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, “आमचे डीलर नेटवर्क हे आमच्यासाठी मुख्य आधारस्तंभांचा एक भाग आहेत आणि त्यांच्या सततच्या प्रयत्नातून आम्ही इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत आहोत.

कंपनीला विश्वास आहे की, या योजनेअंतर्गत ते इलेक्ट्रिक व्हेइकल्सची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि हा ग्राहकांसाठी चांगला अनुभव असेल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT