Credit Card
Credit Card esakal
अर्थविश्व

1 जुलैपासून टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं?

सकाळ डिजिटल टीम

1 जुलैपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.

नवी दिल्ली : १ जुलै २०२२ पासून क्रेडिट (Credit card) आणि डेबिट कार्डशी (Debit card) संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १ जुलैपासून कार्ड पेमेंटसाठी टोकनायझेशन प्रणाली (Tokenization system) लागू होणार आहे. ऑनलाइन बँकिंग होत असलेली फसवणूक रोखणं हा टोकनायझेशन प्रणालीचा उद्देश आहे.

तुम्ही तुमचं कार्ड टोकन न केल्यास, ऑनलाइन स्टोअरवर सेव्ह केलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काढून टाकल्या जाईल. कार्ड टोकनायझेशन अनिवार्य नसले तरी ते एकाच वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून वारंवार खरेदी करण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी अगदी सोपं असणार आहे.

कार्ड टोकनीकरण म्हणजे काय?

टोकनायझेशन (Card Tokenization) म्हणजे, कार्डच्या मूळ डिस्क्रिप्शनला टोकननं बदलणं. जे कार्ड कॉम्बिनेशसाठी युनिक असेल. टोकन रिक्वेस्टर ग्राहकांकडून कार्ड टोकनसाठी रिक्वेस्टर स्वीकारतं आणि कार्ड नेटवर्कला पाठवतं.

१ जुलैपासून काय होणार बदल?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India, RBI) म्हटलंय की, ३० जून नंतर म्हणजेच १ जुलै २०२२ पासून व्यापाऱ्याला ग्राहकाची डेबिट आणि क्रेडिट कार्डवरची माहिती काढून टाकावी लागेल. याचा अर्थ असा की जर ग्राहकांनी कार्ड टोकनायझेशनसाठी संमती दिली नसेल, तर त्यांना प्रत्येक वेळी ऑनलाइन पेमेंट करताना कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) टाकण्याऐवजी नाव, कार्ड नंबर आणि कार्डची वैधता यासारखे कार्डचे सर्व डिटेल्स टाकावे लागतील. तर दुसरीकडं जर ग्राहकानं कार्ड टोकन देण्यास सहमती दिली, तर त्याला/तिला व्यवहार करताना फक्त CVV आणि OTP टाकावा लागेल.

क्रेडिट आणि डेबिट कार्ड टोकन कसं करावं?

  • शॉपिंग वेबसाइट/अ‍ॅपला भेट देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पेमेंट करावं लागेल.

  • चेकआउट करताना तुम्हाला योग्य वाटेल ते कार्ड पेमेंट पर्याय निवडावा लागेल आणि नंतर CVV टाकावा लागेल.

  • यानंतर “Secure your card” किंवा “Save card as per RBI गाइडलाइन्स” वर क्लिक करावे लागेल. नंतर सेव्ह वर टॅप करून ओटीपी एंटर करावा लागेल.

  • यानंतरच मग तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड टोकनाइज केलं जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT