7th pay commission Marathi News
7th pay commission Marathi News Team eSakal
अर्थविश्व

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी! महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ

सकाळ डिजिटल टीम

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Central government employees) आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी (Pensioners) मोठी आनंदाची बातमी आहे. ३० मार्चला झालेल्या बैठकीमध्ये महागाई भत्त्यामध्ये(Dearness allowance Hike) 3 टक्क्यांनी वाढ मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रारंभिक वार्षिक इनव्हॉइसिंग प्रक्रिया 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

AICPI-IW डिसेंबरची आकडेवारी समोर आल्यापासून कर्मचारी 3 टक्के DA वाढीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3 टक्के DA वाढीची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना मार्चच्या पगारासह नवीन डीए खात्यात जमा केले जाईल. (DA Hiked by 3 percent for Central Govt Employees, Cabinet to Announce Today)

3 टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आली

कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आता 34 टक्के दराने महागाई भत्त्यामध्ये(DA Hike) मिळणार आहे. डिसेंबर 2021 साठी औद्योगिक कामगारांसाठी All-India Consumer Price Index -AICPI एका अंकाने घसरला आहे. महागाई भत्त्याच्या 12 महिन्यांच्या निर्देशांकाची सरासरी 34.04% (Dearness allowance) सह सरासरी 351.33 आहे. परंतु, महागाई भत्ता नेहमी पूर्ण संख्येने दिला जातो. म्हणजेच जानेवारी 2022 पासून एकूण महागाई भत्ता 34% असेल.

डिसेंबरमध्ये AICPI-IW मध्ये झाली मोठी घट

सरकारने या निर्णयामुळे ५० लाख पेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेंशनर्सला फायदा होतो. यानंतर आता पुढील महागाई भत्ता जुलै 2022 मध्ये मोजला जाईल. डिसेंबर 2021 साठी AICPI-IW डेटा (All India Consumer Price Index for Industrial Workers) जारी करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये हा आकडा 0.3 अंकांनी घसरून 125.4 अंकांवर आला. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 125.7 अंकांवर होता आणि डिसेंबरमध्ये 0.24% ने घटली मात्र, त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये काही परिणाम झाला नाही.

नोव्हेंबरमध्ये ही वाढ झाली होती

AICPI-IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढून 125.7 वर पोहोचला, कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार. डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता, डिसेंबर 2021 चा आकडा किंचित कमी झाला असला तरी, जानेवारी 2022 पासून DA मध्ये 3% वाढ जाहीर करण्यात आली आहे.

जुलै 2021 पासून DA मोजणी

महिना अंक DA टक्केवारी

जुलै 2021 353 31.81%

ऑगस्ट 2021 354 32.33%

सप्टेंबर 2021 355 32.81%

नोव्हेंबर 2021 362.016 33 %

डिसेंबर2021 361.152 34%

DA अंकाची मोजणी

जुलै साठी मोजणी- 122.8 X 2.88 = 353.664

ऑगस्टसाठी मोजणी- 123 X 2.88 = 354.24

सप्टेंबरसाठी मोजणी - 123.3 X 2.88 = 355.104

नोव्हेंबरसाठी मोजणी - 125.7 X 2.88 = 362.016

डिसेंबरसाठी मोजणी- 125.4 X 2.88 = 361.152

34 टक्क्यांवर DA वर मोजणी

आता 3% महागाई भत्ता वाढला आहे, तेव्हा DA 34% झाला आहे. आता येथे किमान आणि कमाल मूळ पगारावर त्याची मोजणी करा.

किमान मूळ पगाराची मोजणी

कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये

नवीन DA (34%) 6120 रुपये /महिना

आत्तापर्यंतचा DA (31%) 5580 रुपये / महिना

किती महागाई भत्ता वाढला 6120- 5580 = 540 रुपये/महिना

5. वार्षिक पगार वाढ 540X12 = 6,480रुपये

कमाल मूळ पगाराची मोजणी

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56900 रुपये

नवीन DA (34%) 19346 रुपये/ महिना

आतापर्यंतचा DA (31%) र17639रुपये/महिना

किती महागाई भत्ता वाढला 19346-17639 = . 1,707रुपये / महिना

वार्षिक पगारात वाढ 1,707 X12 = 20,484 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT