Money 
अर्थविश्व

सावधान! Instant Loan च्या नादात होईल नुकसान; RBI ने दिला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व ग्राहकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अ‍ॅपवरून कर्जासाठी अर्ज करत असाल तर सावध व्हा. कारण या माध्यमातून तुमच्या कागदपत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते. तसचं जास्त व्याजदराने कर्जही घेतलं जाऊ शकतं. याशिवाय या पैशांच्या रिकव्हरीची पद्धतही चुकीची असते.

मोबाइल अ‍ॅप, डिजिटल प्लॅटफॉर्मवरून वैयक्तिक किंवा लहान व्यवसायासाठी अनधिकृत कर्ज घेऊ नये असं आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलं आहे. त्वरीत आणि कोणत्याही कागदपत्राशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या प्रलोभनाला बळी पडू नका असं RBI ने ग्राहकांना सांगितलं आहे.

रिझर्व्ह बँकेनं म्हटलं की, अशा प्रकारचं कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त दराने व्याज द्यावं लागतं. यामध्ये अनेक प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. तसंच फोनच्या माध्यमातून तुमच्या पर्सनल डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे असे व्यवहार टाळलेले बरे असंही म्हटलं आहे. 

सर्वसामान्य लोकांना सावध केलं जातंय की अशा प्रकारच्या कोणतेही व्यवहार किंवा ऑनलाइन, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कर्जासाठी कागदपत्रे देऊ नयेत असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं. केवायसी डॉक्युमेट कोणत्याही अज्ञात व्यक्तीला, अनधिकृत अ‍ॅपला देऊ नये. अशा प्रकाराबाबत संबंधित कायदेशीर संस्थांना वेळीच माहिती द्यावी. 

कर्ज घ्यायचंच असेल तर रिझर्व्ह बँकेच्या एनबीएफसी किंवा इतर संस्था ज्यांना राज सरकारकडून मान्यता आहे त्यांच्याकडून घ्यावं. यामध्ये फसवणुकीचे धोके नसतात आणि तुमची कागदपत्रे सुरक्षित असतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

Latest Marathi News Updates : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी; राष्ट्रपती भवनमध्ये सोहळा

बार्शी तालुका हादरला! 'शेतकऱ्याने मानसिक त्रासातून संपवले जीवन'; पत्नीस शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी, त्रास असाह्य झाला अन्..

Hong Kong Open 2025 : आयुषचा जागतिक पदक विजेत्याला धक्का; पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT